Homeदेश-विदेशऑपरेशन सिंदूरनंतर चीनने आपले स्थान स्पष्ट केले म्हणून पाकिस्तानला कोणतीही पाठिंबा नाही

ऑपरेशन सिंदूरनंतर चीनने आपले स्थान स्पष्ट केले म्हणून पाकिस्तानला कोणतीही पाठिंबा नाही


ऑपरेशन सिंदूर: पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मध्यरात्री भारतानं दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जगातील अनेक मोठ्या महाशक्ती भारताच्या पाठिशी असल्याचंच दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अनेक वर्षांपासूनच आहे. तसंच हा संघर्ष लवकर संपले अशी आशा असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर भारताच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं कोणतीही कृती करण्याचा विचार करू नये, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी पाकिस्तानला बजावलं आहे.

अमेरिकेनं पाकला बजावलं

भारताच्या कारवाईविरोधात कोणतीही कृती करण्याचा पाकिस्ताननं विचार करू नये. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा भारताला अधिकार होता. त्यामुळे भारताला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं कोणतीही योजना आखू नये. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंनी फटकारलं. भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर भारताला जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिकेनं पाकिस्तानला बजावल्यानंतर आता इस्त्रायलनं देखील भारताचं समर्थन केलं आहे.

इस्त्रायलकडून भारताचं समर्थन

भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर चीन पाकिस्तानची साथ देईल अशी शक्यता होती. मात्र, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चीननं आपली भूमिका बदलल्याचं दिसत आहे.

चीनची भूमिका काय?

आम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे चीनच्या शेजारी आहे. दहशतवाद जगासाठी धोकादायक आहे. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेवर भारतानं एअर स्ट्राईक केल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे. भारतानं केलेला हल्ला दहशतवाद्यांवर नसून तो सर्वासामान्य जनतेवर केल्याचं पाकिस्तानला जगाला दाखवायचं होतं. मात्र, भारतानं दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना अचूक टार्गेट करत त्यांचा खात्मा केला. याचं ब्रिफिंग देखील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळेच भारताला जगातील शक्तिशाली देशांनी समर्थन देत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!