Homeदेश-विदेशहोम लोन एसबीआय एचर्चने आरबीआयद्वारे आक्रमक व्याज दर कपात केल्याचा अंदाज आहे...

होम लोन एसबीआय एचर्चने आरबीआयद्वारे आक्रमक व्याज दर कपात केल्याचा अंदाज आहे की एफवाय 26 मध्ये बँकिंग अद्यतने जाणून घ्या


गृह कर्ज व्याज दर: घर खरेदीचा विषय आला की इतकी मोठी रक्कम नेमकी आणायची कुठून हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. पैशांची किंवा अनामत रकमेची जुळवाजुळव होते आणि मग उर्वरित रकमेसाठी बँकेची मदत घेतली जाते. विविध बँकांकडून विविध व्याजदरांवर कर्ज दिलं जातं, याच कर्जाच्या बळावर अनेकजण खर खरेदीचं स्वप्न साकारतात आणि निर्धारित व्याजदरानुसार बँकेनं दिलेलं हे कर्ज फेडतात.

अनेकदा कर्जावर असणाऱ्या व्याजाचाच आकडा पाहून काही मंडळ घर खरेदीचं स्वप्न दूर लोटतात. याच गृहकर्जावरील व्याजदरासंदर्भात भारतीय स्टेट बँकेनं महत्त्वाची माहिती जारी केली आहे. भारतीय स्टेट बँकेनं (SBI) जारी केलेल्या एका अहवालानुसार भारतीय रिझर्व्ह बँक पुढील आर्थिक वर्षात (FY26) मध्ये व्याजदरात मोठी कपात करु शकते. महागाई घटल्यानं हा निर्णय घेतला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

SBI च्या रिसर्च रिपोर्टनुसार मार्च 2025 मध्ये उपभोक्ता सूचकांक  (CPI) महागाई दर 3.34 टक्क्यांपर्यंत कमी झाला असून, हा आकडा मागील 67 महिन्यांमधील सर्वात कमी दराचा आकडा ठरला आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या दरात झालेली कपात हे यामागचं कारण असून, पुढील वर्षी महागाई दर आणखी कमी होण्याचा अंदाज हा अहवालातून वर्तवण्यात आला आहे.

SBI कडून जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 2026 च्या आर्थिक वर्षामध्ये महागाई दर 4 टक्क्यांहून कमी राहणार असून पहिल्या तीन महिन्यांमध्ये हा आकडा 3 टक्क्यांहून कमी असू शकतो.

व्याजदरात होणार कपात

अहवालानुसार RBI कडून जून आणि ऑगस्ट 2025 मध्ये 75 बेसिस पॉईंटनं कपात केली जाऊ शकते. यानंतर त्याच वर्षाच्या उत्तरार्धामध्ये 50 बेसिस पॉईंट  (0.50%) नं आणखी कपात होऊ शकते. एकंदरच आरबीआय व्याजदरात 125-150 बेसिस पॉईंटची घट अपेक्षित आहे. एकंदर परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास व्याजदर मार्च 2026 मध्ये न्यूट्रल रेटच्याही खाली येऊ शकतो.

एसबीआयनं व्याजदर कमी होण्याच्या या कालावधीला ‘गोल्डीलॉक्स पीरियड’ म्हणून संबोधलं असून, महागाई कमी करून देशाची आर्थिक वृद्धी (नॉमिनल GDP) 9-9.5% च्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. व्याजदर कपात करण्यासाठी आरबीआयसाठीसुद्धा हा अतिशय योग्य वेळ असून यामध्ये 50 बेसिस पॉईंटच्या एका मोठ्या कपातीचे संकेत इथं मिळत आहेत.

कमीत कमी कोणत्या स्तरावर पोहोचणार व्याजदर?

Union Bank of India आणि Central Bank of India 5 मे 2025 पर्यंत 800+ क्रेड‍िट स्‍कोर असणाऱ्या बँक ग्राहकांना 7.85 च्या व्याजदरानं कर्ज देत आहेत. एसबीआयच्या माहितीनुसार रेपो रेट जर 1.25 टक्क्यांनी कमी होऊन 4.75 टक्क्यांवर आला तर बँकांच्या वतीनं होमलोनच्या व्याजदरातही कपात केली जाऊ शकते. असं झाल्यास 7.85 टक्क्यांवरून व्याजदर थेट 6.6 टक्क्यांवर पोहोटचण्याची दाट शक्यता आहे.

व्याजदर कपातीत अडचणी काय?

व्याजदरात कपात झाल्यास बँकांमधील जमा रकमेतही घट होऊ शकते. त्यामुळं जमा रकमेती वाढ अतिशय धीम्या गतीनं होऊन खातेधारकांची मागणी मात्र वाढू शकते. परिणामी बँकांचं क्रेडिट आणि डिपॉझिट यांच्यातील अंतर वाढू शकतं. एसबीआय रिसर्चच्या माहितीनुसार ल‍िक्‍व‍िड‍िटी अर्थात रोकड मात्र कमी होणार नाही. तेव्हा आता व्याजदरासंदर्भात हा निर्णय नेमका कधीपर्यंत घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भागवत म्हणाले- RSS गुप्त संघटना नाही, सरकारलाही माहीत आहे:100 वर्षांत कोणीही नोंदणी करण्यास सांगितले...

0
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या नोंदणीची मागणी फेटाळून लावत म्हटले की, संघटना ना गुप्त आहे ना जनतेच्या नजरेपासून दूर काम करते. केरळमधील...

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!