Homeदेश-विदेश१ 1984. 1984 वर कॉंग्रेसने केलेल्या चुकांवर राहुल गांधी शीख दंगल राम...

१ 1984. 1984 वर कॉंग्रेसने केलेल्या चुकांवर राहुल गांधी शीख दंगल राम मंदिर भाजपाला लक्ष्य देखील नवीनतम अद्यतन माहित आहे.


राहुल गांधी बातम्या: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच काँग्रेस पक्षाकडून झालेल्या चुका आणि तत्सम काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी तणावग्रस्त परिस्थितीमध्ये एक पक्ष म्हणून काँग्रेसनं काही चुकीच्या भूमिका घेतल्या. अर्थात त्या वेळी आपण पक्षाचा भाग नव्हतो. मात्र त्या चुकांची जबाबदारी मात्र आपण स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं. 1980 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचंच होतं असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

अमेरिकेतील ब्राउन विश्वविद्यालयातील ‘वॉटसन इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’मध्ये आयोजित एका संवादसत्रादरम्यान त्यांनी ही वक्तव्य केली. याच कार्यक्रमातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर भारतीय माध्यमांमध्ये त्यासंदर्भातील चर्चांना वाव मिळाला.

काय म्हणाले राहुल गांधी?

अमेरिकेतील या कार्यक्रमामध्ये एका शीख विद्यार्थ्याने 1984 मध्ये झालेल्या हिंसेवरून प्रश्न उपस्थित करत या समुदायाशी ताळमेळ साधण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? असा प्रश्न केला. यावेळी विद्यार्थ्यानं राहुल गांधी यांच्या गतवेळीच्या अमेरिका दौऱ्याचा उल्लेख  करत त्यांच्या यापूर्वीच्या वक्तव्याचीसुद्धा आठवण करून दिली. या प्रश्नावर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

‘मला नाही वाटत की, शीखांना कोणत्या गोष्टीचं भय आहे. मी जे वक्तव्य केलं होतं त्याच मी असं म्हणालो होतो की, खरंच आपल्याला असा भारत देश हवा आहे जिथं नागरिकांना आपल्या धर्माविषयी व्यक्त होतानाही संकोचलेपणा वाटेल? राहिला मुद्दा काँग्रेसच्या चुकांचा, तर त्यातल्या अनेक चुका तेव्हा झाल्या जेव्हा मी पक्षाचा भाग नव्हतो. मात्र, काँग्रेस पक्षानं गतवर्षांमध्ये ज्या काही चुका केल्या आहेत त्यांची जबाबदारी मी पूर्णपणे स्वीकारतो.’

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच होतं असं मी अनेकदा जाहीरपणे म्हणालो आहे असं म्हणताना आपण स्वत: अनेकदा सुवर्ण मंदिराला भेट दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतात शीख समुदायाशी आपलं असणारं चांगलं नातं अधोरेखित करताना त्यांनी आपली भूमिक मांडली. त्यांच्या याच व्हिडीओतील काही भाग भाजपनं हेरला आणि या पक्षातील आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना तो विद्यार्थी निष्कारण भीती पसरवणाऱ्या त्या वक्तव्याची आठवण करून देत असल्याची भूमिका मांडली.

या कार्यक्रमादरम्यान प्रभू श्रीरामाचा उल्लेख पौराणिक व्यक्ती म्हणून केल्यानंही भाजपनं राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. आपलं मत मांडताना ते म्हणाले होते, ‘सर्वच महान राजनैतिक विचारवंत, समाजसुधारक गुरू नानक, कर्नाचकातील बसवेश्वर, केरळातील नारायण गुरू, फुले, महात्मा गांधी, आंबेडकर हे सर्वजण तुम्हाला एका दृष्टीकोनातून पाहतात. यापैकी कोणीच कट्टरतावादी नाही. किंबहुना आपल्या संविधानातच म्हटलंय की, सत्य आणि अहिंसाच कायमच सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात.’

भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही- राहुल गांधी

आपल्यासाठी ही मूल्य भारतीय परंपरा आणि भारतीय इतिहासाचा आधार आहेत असं सांगताना मी अशा एकाही व्यक्तीला ओळखत नाही, ज्याचा आपण महान मानतो आणि जो वरील गटांमध्ये मोडत नाही. ‘आपली सर्वच पौराणिक व्यक्तीत्वं, अगदी प्रभू श्रीरामही तसेच होते. ते दयावान होते, क्षमाशील होते. त्यामुळं भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही. मी स्वत: हिंदू विचारसरणीला अधिक बहुलवादी आणि अधिक आपलेपणाची मानतो. अधिक स्नेही, सहिष्णू आणि उदारमतवादी मानतो’, असं राहुल गांधी म्हणाले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!