Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रावर अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली...

महाराष्ट्रावर अवकाळी संकट! ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली…

महाराष्ट्र हवामान आज: राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत 3 ते 10 मेपर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी एखाद-दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट, वाऱ्यासह  पावसाची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यांत जाणवू शकतो. तसंच, गारपिटीचीही शक्यता आहे. मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल, तर दुपारी निरभ्र राहील.

महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ अंशापर्यंत असून तर काही ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपर्यंत आहे. शनिवारपासूनच्या आठवड्यात तापमान दोन अंश सेल्सिअसने खालावण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.

‎ईशान्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. पंजाबपासून राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ टिकून आहे.

मुंबईसह ठाणे पालघर आणि भागात येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तविली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

पुणे खान कुटुंबाने आषाढी वारी सेवा सुरू ठेवली आहे, सर्व-विश्वास एकोपा कायम ठेवला आहे

0
आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
spot_img

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...

अमेरिकन व्यावसायिक पायलट म्हणाले- डिजिटल जगात घाई करू नका:फक्त टेक्स्ट मेसेजमुळे ओळख हिरावली; डोळ्यासमोर...

0
जर तुमच्या मुलांचे फोटो, बँक खात्यांचे पासवर्ड आणि तुमची डिजिटल ओळख एकाच 'की'ने सुरक्षित असतील आणि ती एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर...
error: Content is protected !!