Homeदेश-विदेशGK : पैसाच पैसा! गावात 364 घरं, 1761 लोकसंख्या; 'या' टोलनाक्याची कमाई...

GK : पैसाच पैसा! गावात 364 घरं, 1761 लोकसंख्या; ‘या’ टोलनाक्याची कमाई देशात सर्वाधिक


भारतातील सर्वात श्रीमंत टोल प्लाझा: भारतातील महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला टोल प्लाझाला पैसे द्यावे लागतात. तुम्हाला देशातील सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या टोल नाक्याचे नाव माहितीये का? 364 घरं असलेले गाव जिथे 1761 लोकसंख्या आहे, अशा या छोट्याश्या गावातील टोल प्लाझा मालामाल आहे. देशातील सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा म्हणून तो अव्वल स्थानी आला आहे. या टोल प्लाझा आहे कर्जन, ज्याचं वार्षिक उत्पन्न हे सुमारे 500 कोटींच्या घरात आहे. हा टोल प्लाझा गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील भरथानामधील आहे. विशेष म्हणजे हा टोल प्लाझा सलग चार वर्षांपासून 400 कोटींपेक्षा अधिक कमाई करत आहे. हा प्लाझा राष्ट्रीय महामार्ग-48 (National Highway No. 48) वर आहे जो सध्या दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा मुख्य आणि एकमेव महामार्ग असून ते चेन्नईपर्यंत जातो. त्याशिवाय हा मार्ग उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांना जोडतो. (gujrats karjan 364 houses in the village 1761 population indias richest toll plaza earns the highest in the country Gk in marathi)

हा महामार्ग तामिळनाडू आणि हरियाणा या ऑटोमोबाईल केंद्रांनादेखील जोडते. हे गुजरातमधील औद्योगिक शहरं आणि दहेज बंदराचे प्रवेशद्वार असून उत्तरेकडील त्याचा एक भाग दिल्ली-गुडगाव एक्स्प्रेसवे आणि दिल्ली-जयपूर महामार्ग म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडील दुसरा भाग अहमदाबाद-मुंबई महामार्ग म्हणून ओळखला जातो. कर्जन टोल प्लाझा वडोदरा आणि मुंबई दरम्यानच्या औद्योगिक रस्त्यावर असून गुजरात हे भारतातील एक प्रमुख रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उत्पादन केंद्र आहे.

‘हे’ आहे कमाईचं रहस्य!

बहुतेक युनिट्स मध्य आणि दक्षिण गुजरातमध्ये आहेत. इथे पोहोचण्याचा मार्ग करंजनमधून जातो. यामुळे आणि दहेज बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीमुळे, प्लाझाला भेट देणारी सुमारे 65% वाहने व्यावसायिक असतात. यामध्ये कंटेनर, ट्रक आणि टँकर इत्यादींचा समावेश असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वतीने प्रकाश अ‍ॅस्फाल्टिंग्ज अँड टोल हायवेज (PATH) इंडिया लिमिटेड या प्लाझाचे व्यवस्थापन करत असतात.

प्लाझाचे ऑपरेशन्स मॅनेजर रंगेश मिश्रा म्हणाले, ‘प्रवाशांसाठी, हा फक्त एक टोल प्लाझा आहे. मात्र आमच्यासाठी, तो उत्तर-दक्षिण वाहतूक सुरळीत ठेवण्याबद्दल महत्त्वाचा आहे.’ हा टोल प्लाझा 2009 मध्ये बांधण्यात आला असून गुजराती कारखाने मुंबई बंदरांवर त्यांचा माल वाहून नेण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते चांगले काम करत आहे. गुजरातच्या रस्ते आणि इमारती विभागाचे सचिव पी आर पटेलिया म्हणाले की, औद्योगिक वाहतुकीव्यतिरिक्त, कर्जन प्रवासी वाहनांकडूनही टोल वसूल करत आहेत.

फास्टॅगची ओळख

13 वर्षांपूर्वी तत्कालीन माजी खासदार विठ्ठल राडाडिया यांनी एका टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्याशी झालेल्या वादात पिस्तूल रोखली होती. तेव्हा 13 वर्षांपूर्वी कर्जन टोल प्लाझा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या प्लाझावर तीन शिफ्टमध्ये 24 तास कर्मचारी काम करतात. चार व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली 190 कर्मचारी आहेत. यापैकी सुमारे 80 कर्मचारी टोल वसूल करण्यात व्यस्त असतात. त्याचप्रमाणे, चालकांना मदत करण्यासाठी लेनमध्ये 33 कर्मचारी तैनात असतात. आयटीमध्ये पाच कर्मचारी काम करतात. बाकीचे लोक साफसफाई आणि देखभालीचे काम पाहतात.

इतके वर्दळ असूनही, या टोल नाक्यावर कधीही वाहतूक कोंडी होत नाही. या ठिकाणाहून वारंवार ये-जा करणारे वाहतूकदार प्रीतेश शाह म्हणाले की, प्लाझाच्या दोन्ही बाजूला 11 टोल लेन आहेत आणि FASTag सुरळीतपणे काम करते. त्यामुळे वाट पाहण्याची गरज नाही. एनएचएआयच्या फास्टॅग पायलट प्रकल्पासाठी कर्जन हे चाचणी स्थळ होते. येथे हिरवा कंदील मिळाल्यानंतर, राष्ट्रीय स्तरावर FASTag लाँच करण्यात आला. एनएचएआयचे माजी महाव्यवस्थापक आणि प्रकल्प संचालक एसपी शर्मा म्हणाले, “हा बराच काळ आमच्या स्टार टोल प्लाझांपैकी एक आहे. 2017 मध्ये, या प्लाझावर दररोज टोल वसूल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!