पहलगम दहशतवादी हल्ल्यावरील शरद पोंशे: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची दाहकता अजूनही संपूर्ण भारतात पाहायला मिळते. यावर भारत काही तरी करेल अशी सगळ्यांना आशा आहे. तर या हल्ल्यावर आता लोकप्रिय मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे
पाकिस्तानच्या हल्ल्यावर शरद पोंक्षे म्हणाले, ‘आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे. आपण सगळ्यांनी व्हिडीओ पाहिले आहे. ज्यांच्या घरातील लोकांना मारलं आहे त्यांनी सांगितलं की धर्म विचारला. पण जर कोणी विचारला नाही असं कोण म्हणतं असतील तर त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ. पाकिस्तानशी सगळे संबंध तोडले पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे. पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हायला पाहिजे. आपण युद्ध टाळण्यासाठी खूप संधी दिली आहे. आता पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याची वेळ आली आहे. कोण कलाकार यावर बोलत नाहीत याच्याशी मला देणंघेणं नाही. मी अभिनेता आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे. आता इतिहासातील सगळं उट्ट काढण्याची संधी आली आहे. आता नकाशावरून सगळं संपवूनच टाकूया. मोदींवर माझा खूप विश्वास आहे ते सर्व करून दाखवतात जास्त बोलत नाहीत. एकदा लचका कापावा लागतो, ती वेळ आता आली आहे. जे बांधव या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल असं पाऊल उचलले जाईल.’
महागाई, बेरोजगारी आणि हिंदुत्व
पुढे महागाई, बेरोजगारी आणि हिंदुत्ववर शरद पोंक्षे म्हणाले, ‘महागाई, बेरोजगारी हे प्रश्न निर्माण केले जातात असे काही नाही, हे केवळ दाखवलं जातं. हिंदुत्व म्हणजेच पुरोगामित्व आहे हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी हिंदुत्ववादी म्हणजेच पुरोगामी आहे. अंदमान यात्रा सुरूच आहे. त्याठिकाणी आम्ही तरुण मुलांना घेऊन जातो. त्या ठिकाणी असलेल्या जेलमध्ये तरुणांना लेक्चर देतो. तिथला अनुभव तरुणांना देतो, सावरकर त्याठिकाणी कसे राहिले असतील हे दाखवतो. प्रत्येक आमदाराला अंदमानला घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे तिथली परिस्थिती त्यांच्या लक्षात येईल.’
हेही वाचा : शिवपुत्र संभाजी महानाट्यावरुन राजकीय नाट्य, अमोल कोल्हेंवर प्रयोग रद्द करण्याची वेळ, नेमकं काय झालं?
राहुल गांधींना अंदामानला घेऊन जाण्याची इच्छा
‘तिथं जाऊन आल्यानंतर सावरकरांबद्दल जे बोललं जातं ते बोलणार नाहीत. राहुल गांधी जर अंदमानला येणार असतील तर मी त्यांना घेऊन जाईन. त्यांना खर्च परवडत नसेल तर मी त्यांचा खर्च करतो.’

























