Homeदेश-विदेशबीफ पार्टीचा अनादर केलेला हिंदू देवतांचा अनादर होता, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू डॅनिश...

बीफ पार्टीचा अनादर केलेला हिंदू देवतांचा अनादर होता, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू डॅनिश कनेरिया स्लॅम हृतिक रोशन


हृतिक रोशन यूएस टूर: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दिनेश कानेरियाने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनबद्दल धक्कादायक दावा केला आहे. हृतिक नुकताच अमेरिका दौऱ्यावर होता. याच दौऱ्यासंदर्भात कानेरियाने हृतिक रोशनने खसित्तानी विचाराचे कट्टरतावादी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचा आरोप केला आहे. भारत सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या व्यक्ती उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला हृतिकने हजेरी लावल्याचा आरोप कानेरियाने केला आहे.

सर्वच स्तरामधून संताप

हृतिक रोशन उपस्थित असलेल्या या कार्यक्रमादरम्यान ‘गोमांसा पार्टी’ही झाली आणि या ठिकाणी हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप कानेरियाने केला आहे. भारतामधील प्रसिद्ध गायक शान हा पुढील महिन्यामध्ये याच ग्रुपबरोबर कार्यक्रम करणार असल्याने याबद्दलही कानेरियाने चिंता व्यक्त केली आहे. कानेरियाने केलेल्या दाव्यांमुळे सर्वच स्तरामधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

काय म्हटलं आहे या पाकिस्तानी खेळाडूने?

हृतिकच्या कार्यक्रमाबद्दल चिंता व्यक्त करताना कानेरियाने, “त्याने कट्टरतावाद्यांबरोबरच भारत सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या लोकांसोबत कार्यक्रम आयोजित केलेला. त्या ठिकाणी बीफ पार्टी झाली आणि भारतीय देवी-देवतांचा प्रचंड अपमान करण्यात आला. पुढील महिन्यात याच ग्रुपबरोबर शान कार्यक्रम सादर करणार आहे. मी भारतीय गृहमंत्रालयाकडे या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो,” असं म्हणत पोस्ट केली आहे.

दोन्ही स्टार्सकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

कानेरियाने केलेल्या दाव्यावर हृतिक किंवा शान किंवा त्यांच्यावतीने कोणीही कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. कानेरिया हा हिंदू धर्मीय असून पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळणारा तो केवळ दुसरा आणि बिगरमुस्लीम सातवा खेळाडू आहे.

अमेरिका दौरा वादात

याच महिन्याच्या सुरुवातीला हृतिक रोशनच्या अमेरिका दौऱ्यावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलेली. या दौऱ्याच्या नियोजनामध्ये अनेक त्रुटी  होत्या. अनेकांनी तिकिटांसाठी 1.2 लाख रुपये भरल्यानंतरही हृतिकला भेटून देण्याचं आश्वासन असताना साधं त्याला पाहताही आलं नाही असंही म्हटलेलं.

बीफ समोसे आणि मद्यविक्री

या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोमांस आणि मद्य विक्री करण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केलेला. 10 एप्रिल रोजी स्तंभलेखक विवेक बन्सलने या कार्यक्रमाच्या ठिकाणचे फोटो शेअर केलेले ज्यामध्ये बीफ समोसा दिसत होता. तसेच मद्यविक्रीचा व्हिडीओही त्याने पोस्ट केलेला.

रंगोत्सव नावाने होस्टनमध्ये राम नवमीनिमित्त 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हृतिकने हजेरी लावलेली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!