Homeमनोरंजनकेएल राहुल वडील सासू सुनील शेट्टी सांगा की राहुल या आयपीएल हंगामात...

केएल राहुल वडील सासू सुनील शेट्टी सांगा की राहुल या आयपीएल हंगामात व्हायरल का चांगले काम करत आहे


आयपीएल 2025: आयपीएल 2025 स्पर्धेचे आता काही सामने शिल्लक राहिल्याने त्यातील रोमांच आता वाढू लागला आहे. मागील तीन वर्ष लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणारा केएल राहुल (KL Rahul) यंदाच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यांमध्ये राहुलने 53 धावांच्या सरासरीने एकूण 371 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये तो नवव्या स्थानावर आहे.

जावयाबाबत काय म्हणाला सुनील शेट्टी :

इंडियन प्रीमिअर लीगच्या 18 व्या सीजनमध्ये केएल राहुलच्या स्फोटक फलंदाजीचं कौतुक त्याचे सासरे आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने यांनी केले.  केएल राहुल याने सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्याशी 2023 मध्ये विवाह केला. मार्च 2025 मध्ये अथिया आणि राहुलला एक गोंडस मुलगी देखील झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश चोपडा आणि सुनील शेट्टी बोलत होते. यावेळी केएल राहुलच्या यंदाच्या सीजनमधील परफॉर्मन्सबद्दल ते दोघे बोलत होते. यावेळी सुनील शेट्टी म्हणाला की, ‘खरोखरच! राहुल चांगलं खेळतोय यात दिल्लीचा सुद्धा इम्पॅक्ट आहे आणि टीम ओनरशिपचा सुद्धा इम्पॅक्ट आहे. तुम्हाला याबाबत नक्की कळले की कारण जिथे तुम्ही कम्फर्टेबल असता, त्या माहोलमध्ये मिसळून जात. माझ्या मते हा त्याचा परिणाम आहे. मला माहितीये की यंदा तो दिल्ली कॅपिटल्समध्ये खुश आहे. टीमच्या ओनरशिप आणि बाकी खेळाडूंमुळे सुद्धा, हेच कारण आहे की ते त्याच्या परफॉर्मन्समधूनही दिसतंय.

हेही वाचा : 29 व्या मजल्यावर हिटमॅनचं घर! 300000000 रुपये किंमतीच्या या घरात काय आहे खास? पाहा Inside Photos

लखनऊ संघाच्या मालकांसोबत झाला होता वाद :

आयपीएल 2024 मध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळत असताना एका सामन्यात पराभवानंतर त्याच्यात आणि संजीव गोएंका यांच्यात भर मैदानात वाद झाला होता. सामन्यात लखनऊचा पराभव झाल्यावर कर्णधार असलेल्या केएल राहुलवर टीमचे मालक संजीव गोएंका हे भडकले होते ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर केएल राहुलला आयपीएल 2025च्या मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन करण्यात आले नाही. तेव्हा मेगा ऑक्शनमध्ये केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटींना करारबद्ध केले.

केएल राहुलचं आयपीएल करिअर :

स्टार फलंदाज आणि विकेटकिपर केएल राहुल याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 141 सामने खेळले असून आतापर्यंत तो आरसीबी, पंजाब किंग्स, लखनऊ आणि दिल्ली अशा संघांचा भाग राहिला आहे. या दरम्यान त्याने 132 इनिंगमध्ये 45.95 च्या सरासरीने 5054 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये केएल राहुलने एकूण 40 अर्धशतक आणि चार शतक ठोकली असून यात त्याचा सर्वोत्तम स्कोअर हा 132 धावांचा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक...

0
भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या...

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!