Homeदेश-विदेशभारत पाकिस्तान युद्ध पाकिस्तान आयटी मंत्री पुढील 24 ते 36 तासांत भारतीय...

भारत पाकिस्तान युद्ध पाकिस्तान आयटी मंत्री पुढील 24 ते 36 तासांत भारतीय लष्करी संपाचा विश्वासार्ह पुरावा दावा करतात


भारत पाकिस्तान युद्ध नवीनतम अद्यतनः भारत आणि पाकिस्तान नात्यामध्ये निर्माण झालेली दरी आता आणखी रुंदावली असून, यामुळं दोन्ही देशांमध्ये असणारा दुरावा अतिशय कटू वळणावर आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तर, पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशी जनसामान्यांची मागणी असतानाच मोदी सरकारनंही पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं स्पष्ट होत आहे. इथं पाकिस्ताननं सर्वच स्तरांवर पाकिस्तानची कोंडी केलेली असतानाच आता पाकच्या अधिकाऱ्यांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांचाच थरकाप उडाला आहे. इतका की, रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या देशाच्या मंत्र्यांनी साऱ्या देशाला खडबडून जागं केलं आहे. (Pahalgam Attack Latest Update)

पुढच्या 24 ते 36 तासांत भारत हल्ला करण्याची शक्यता…

पाकिस्तानचे सूचना मंत्री अताहउल्ला तरार यांनी X च्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला. जिथं, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत भारताकडून पाकिस्तानवर पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये मोठा हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याचा मुद्दा त्यांनी देशापुढं मांडत चिंता व्यक्त केली.

भारतावर पाकिस्तानी मंत्र्यांचे गंभीर आरोप

हल्ल्याचं सावट असतानाही भारताविरोधात गरळ ओकत पाकिस्ताच्या या मंत्र्यांनी काही गंभार आरोप केले. कोणत्याही निष्पक्ष चौकशीशिवाय भारतानं थेट लष्करी पर्याय निवडण्याची तयारी दाखवली असून, यामुळं क्षेत्रीय शांतता भंग होऊ शकते आणि ही घातक बाब आहे असं ते म्हणाले. पाकिस्ताननं या प्रकरणात स्वतंत्र आणि निष्पक्ष आंतरराष्ट्रीय जाणकारांच्या मदतीनं चौकशीची मागणी केली असून, भारत मात्र या मागणीला धुडकावत संघर्षाच्या वाटेवर निघाला असल्याची उलटी बोंब तरार यांनी ठोकली.

तिथं पाकिस्तानवर भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीचं सावट असतानाच दुसरीकडे शेजारी राष्ट्राचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनीसुद्धा रॉयटर्सशी संवाज साधताना पाकिस्तान हाअ अलर्टवर असून भारतानं हल्ला केल्यास आपला देश त्याचं प्रत्युत्तर देईल असा पोकळ विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी अण्वस्त्रांचा वापर फक्त आणि फक्त देशाच्या अस्तित्वाचाच प्रश्न उद्भवल्यास केला जाईल असं म्हणत भारताला डिवचलं.

भारतीय सैन्याला ठिकाण, लक्ष्य आणि वेळ निवडण्याची मुभा- पीएम मोदी

तिथं पाकिस्तानचा भीतीनं थरकाप उडालेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात देशातून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी गरज भासल्यास आवश्यक कारवाईची मुभा सैन्यदलाला दिली आहे. ज्याअंतर्गत भारतीय सैन्याला ठिकाण, लक्ष्य आणि वेळ निवडण्याची मुभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आता पंतप्रधानांनी दिलेली मुभा, पाकिस्तानच्या मनात असणारी भीती आणि सीमाभागातील तणाव पाहता पुढे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!