Homeमनोरंजनआयपीएल २०२25 वैध सूर्यावन्शी जीटी विरुद्ध शतकासह वीरेंद्र सेहवागला उत्तर द्या

आयपीएल २०२25 वैध सूर्यावन्शी जीटी विरुद्ध शतकासह वीरेंद्र सेहवागला उत्तर द्या


आयपीएल 2025: आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर सर्वांचं लक्ष राजस्थान रॉयल्स संघात असणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे होतं. 1 कोटीत खरेदी केलेला वैभव खरंच वेगवान आणि त्यातही जगातील सर्वोत्तम गोलंदाजांसमोर टिकेल का अशी शंका अनेकांच्या मनात होती. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर षटकार लगावत वैभवने आपण किती उत्कृष्ट फलंदाज आहोत याची झलक दाखवली. यानंतर गुजरातविरोधातील सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकत त्याने त्याच्याबाबत सुरु असलेल्या सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे. वैभव सूर्यवंशीने फक्त 100 तासात भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागलाही उत्तर दिलं आहे. सेहवागने मी अनेक खेळाडूंना एक, दोन सामन्यानंतर गायब होताना पाहिलं आहे असं म्हटलं होतं.

IPL 2025: ‘नशिबाने त्याला…’, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या शतकावर शुभमन गिलची प्रतिक्रिया वादात; जडेजा म्हणाला ‘नुसतं टीव्हीवर…’

गुजरातविरोधातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने 38 चेंडूत 101 धावा करत तुफानी खेळी केली. अनेकांनी आपण अशी खेळी कधीच पाहिलं नसल्याचंही म्हटलं. एक 14 वर्षांचा मुलगा इतक्या निर्भीडपणे समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला टोलेगंज षटकार लगावतो हे पाहणं तसं दुर्मिळच आहे.

सेहवागने वैभवबद्दल काय म्हटलं होतं?

आता वीरेंद्र सेहवाग वैभव सूर्यवंशीबद्दल काय म्हणाला होता हे जाणून घ्या. सेहवागने जे सांगितले ते वैभवच्या शतकाच्या 96 तास आधी म्हणजे 4 दिवस आधीचे होते. 24 एप्रिल रोजी राजस्थान आणि आरसीबी विरुद्ध सामना होता. या सामन्यात वैभव सूर्यवंशी लवकर आऊट झाला होता. त्यानंतर सेहवाग म्हणाला होता की, जर तो या आयपीएलमध्ये खूश असेल आणि आता तो करोडपती आहे असं त्याला वाटत असेल, त्याचे पदार्पण उत्तम झाले असेल, त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला असेल, तर कदाचित तो पुढच्या वर्षी खेळताना दिसणार नाही.

IPL 2025: शतक ठोकल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या पोस्टला 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने दिलं उत्तर; पण X ने सस्पेंड केलं अकाऊंट, कारण…

सेहवाग पुढे म्हणाला होता की, “मी अनेक खेळाडूंना येताना जाताना पाहिलं आहे, जे एक दोन सामन्यांमुळे प्रसिद्ध होतात. पण नंतर ते काहीच करत नाहीत कारण त्यांना वाटतं की आपण स्टार झालो आहोत”. पण आता वैभवने सेहवागला गुजरातविरोधात शतक ठोकत त्याच्याच स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, ज्या फलंदाजीतील अपयशामुळे सेहवागला बोलण्याची संधी मिळाली होती त्याच फलंदाजीने वैभव सूर्यवंशीने त्याचं उत्तर दिलं. सचिन तेंडुलकरची टीकाकारांना उत्तर देण्याची हीच शैली होती. हे एका चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे. वैभव सूर्यवंशीने त्याच्या झंझावाती शतकाने सेहवागला आपली स्वपं, आकांक्षा लहान नसल्याचं दाखवून दिलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!