Homeमनोरंजनऑटो न्यूज स्लेट ऑटो एसयूव्ही रूपांतरण क्षमता जेफ बेझोससह परवडणारी ईव्ही ट्रक...

ऑटो न्यूज स्लेट ऑटो एसयूव्ही रूपांतरण क्षमता जेफ बेझोससह परवडणारी ईव्ही ट्रक लाँच करते


स्लेट ऑटोने परवडणारे ईव्ही ट्रक लॉन्च केले: मागील दशकभराच्या काळाचा आढावा घेतल्यास तंत्रज्ञान नेमकं किती पुढे आलं आहे याचा अगदी सहजपणे अंदाज लावता येतो. त्याच तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत संपूर्ण जगाला अवाक् करणारी कार नुकतीच लाँच करण्यात आली आहे. टोयोटा, मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू नव्हे, तर चक्क एका स्टार्टअप कंपनीनं हे अफलातून वाहन लाँच केलं असून, खुद्द जेफ बेजोस अर्थात अॅमेझॉनच्या मालकांनीसुद्धा यामध्ये गुंतवणूक केल्याचं म्हटलं जात आहे.

बेजोसच नव्हे, तर इतरही मोठ्या गुंतवणुकदारांनी या स्टार्टअप कंपनीत पैसा गुंतवल्याचं म्हटलं जात आहे. जास्तीचं सामान वाहून नेण्यासाठीचा स्टायलिश ट्रक ते एक कमाल कन्वर्टिबल एसयूव्ही असं या वाहनाचं डिझाईन असून स्लेट ऑटोचं हे प्रोडक्ट आहे. The Slate Auto ची ही ईव्ही सध्या अमेरिकेत लाँच करण्यात आली आहे.

कंपनीनं लाँच केलेलं डेब्यू मॉडेल हे कॉम्पॅक्ट दोन दरवाजे असणारं इलेक्ट्रीक पिकअप ट्रक म्हणून पाहताक्षणी लक्ष वेधतं. गरज भासल्यास या वाहनाला पाचजणांची आसनक्षमता असणाऱ्या एसयुव्हीमध्येही कन्वर्ट करता येतं. 15 फुटांहून कमी लांबी असणारा हा ट्रक/ एसयुव्ही Chevrolet Silverado EV च्या दोन तृतीयांश आकाराइतकी असल्याचं म्हटलं जातं. 1400 पाऊड इतकी या वाहनाची पेलोड क्षमता असल्याचं सांगण्यात येतं.

साधारण $25,000 इतक्या किमतीला अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असून या वाहनाचं बेस मॉडेल 241 किमी इतकी रेंज देतं. 52.7 kWh इतक्या बॅटरीसह येणारी ही कन्वर्टीबल एसयूव्ही 84.3 kWh त्या एक्सटेंडेड बॅटरीमध्येही उपलब्ध आहे. या वाहनात कस्टमायझेशनचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळं ते खरेदीदारांना 100 अॅक्सेसरीजचा पर्यायही खुला आहे. कारसोबत 5000 डॉलरचा एसयूव्ही कन्वर्टीबल किट मिळत असून यामधघ्ये रिअर सीट, रोल केज आणि एअरबॅग्सचा समावेश आहे.

प्राथमिक स्वरुपात लाँच करण्यात आलेल्या या कारची उत्पादन प्रक्रिया संपूर्ण क्षमतेनं 2026 मध्ये सुरू होणार असून, ऑटोमोबाईल क्षेत्रात ही कार म्हणजे एक नवी क्रांतीच म्हटली जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!