पहलगम दहशतवादी हल्ला व्हिडिओ: काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांनी प्राण गमावले. दहशतवाद्यांनी भारताचं ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे केलेल्या हल्ल्यादरम्यान झिपलाइन राईडचा आनंद घेत असलेल्या पर्यटकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या पर्यटकाने त्याच्या मोबाईलमध्ये शूट केलेल्या झिपलाइन व्हिडीओमध्ये खाली दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु असल्याची दृश्य न कळत चित्रित झाली आहेत. मात्र त्याचवेळी या व्हिडीओत दिसणाऱ्या झिप लाइन ऑपरेटरची एक कृती फारस संशयास्पद असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामध्ये झिप लाइन ऑपरेटरला ताब्यात घेण्यात आल्याचंही वृत्त आहे.
झिपलाइन ऑपरेटरबद्दल धक्कादायक दावा
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या पर्यटकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्याचं नाव ऋषी भट असं आहे. ऋषी हा मुळचा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी आहे. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मी झिपालाइनवर होतो म्हणून बचावलो असं ऋषीने म्हटलं आहे. मात्र ऋषीने एक अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. झिपालाइन ऑपरेटरने मला झिपलाइनवरुन सोडण्याआधी ‘अल्ला हू अकबर’ असं तीन वेळा म्हटलं आणि त्याचदरम्यान गोळीबार सुरु झाला, असं ऋषीने म्हटलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऋषीने केलेला हा दावा खरा असल्याचं त्यानेच शूट केलेल्या झिपालाइन राईडच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालं आहे.
तो तीनदा ‘अल्ला हू अकबर’ म्हणाला
“मला झिपलाइनवर सोडत असताना झिपालाइन ऑपरेटर ‘अल्ला हू अकबर’ असं म्हणाला. त्यानंतर त्याने मान डावीकडून उजवीकडे वळवली. त्यानंतर त्या बाजूने गोळीबार सुरु झाला,” असं ऋषी भटने ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ऋषीने शूट केलेल्या त्याच्या झिपालाइन व्हिडीओमध्ये ऑपरेटर खरोखरच तीनदा ‘अल्ला हू अकबर’म्हणताना दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये खाली जमीनीवर दहशतवादी गोळीबार करताना तर पर्यटक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळापळ करताना दिसत आहेत. ज्यावेळी हल्ला झाल्या त्यावेळी त्या मोकळ्या मैदानावर 100 हून अधिक पर्यटक होते.
आधी लोक गेले तेव्हा ऑपरेटर काही बोलला नाही
ऋषीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या आधी त्याच्या कुटुंबातील अनेकजण याच झिपलाइनवरुन गेले तेव्हा हा झिपलाइन ऑपरेटर ‘अल्ला हू अकबर’ म्हणाला नव्हता. त्यामुळेच या झिपालाइन ऑपरेटरला दहशतवादी हल्ला होणार याची माहिती होती का? तो दहशतवाद्यांसोबत या हल्ल्यात सहभागी होता का? यासारखे सवाल उपस्थित केले जात आहे.
सोशल मीडियावर ऋषीने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा झिपालाइन ऑपरेटर ‘अल्ला हू अकबर’ काय म्हणाला असावा असा सवाल विचारला जात आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
झिप लाइन रोपवे ऑपरेटरला जप करणे सामान्य आहे का?
– imac_too (@imac_too) 28 एप्रिल, 2025
एनआयएने घेतलं ताब्यात
राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही या व्यक्तीसंभर्भात शंका असून त्यांनी या झिपालाइन ऑपरेटरला ताब्यात घेतलं आहे. आज या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी केली जाणार आहे. त्याने तीनवेळा ‘अल्ला हू अकबर’ का म्हटलं? हल्ल्याची त्याला पूर्वकल्पना होती का? यासारख्या प्रश्नांची उत्तर चौकशीतून मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एनआयए ऋषिचाही जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे.




























