Homeमनोरंजन| दिल्ली स्टेडियममध्ये सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने केएल राहुल माझ्या मैदानाच्या उत्सवाची...

| दिल्ली स्टेडियममध्ये सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने केएल राहुल माझ्या मैदानाच्या उत्सवाची आठवण करून दिली

आयपीएल 2025: आयपीएल 2025 मधील 46 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB VS DC) यांच्यात पार पडला. या दिल्ली कॅपिटल्सचं होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबीने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) मैदानात येत केएल राहुल (KL Rahul)  समोर एक असं सेलिब्रेशन केलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराटने राहुलला जशास तसं उत्तर दिलं. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराटने राहुलच्या जखमेवर चोळलं मीठ :

दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यात रविवारी आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजी करून 8 विकेट गमावून 162 धावा केल्या. तर आरसीबीला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान आरसीबीच्या फलंदाजांनी 18.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून पूर्ण केले. या विजयानंतर विराट मैदानात आला आणि केएल राहुल उभा होता त्या ठिकाणी पोहोचला. विराटने नंतर केएल राहुल समोर जमिनीकडे ईशारा करत ‘हे माझं मैदान’ असं म्हणून सेलिब्रेशन केलं. विराटने गंमतीत राहुलला आठवण करून दिली की दिल्ली हे त्याचं होम ग्राउंड आहे. यासोबतच विराटने राहुलकडून जुना बदला पूर्ण केला. विराटने यावेळी केएल राहुलला चिन्नस्वामी स्टेडियमवरील घटनेची आठवण करून दिली होती, जिथे आरसीबी विरुद्ध सामन्यात विजयी खेळी खेळल्यावर केएल राहुलने KGF स्टाईलने ‘हे माझं मैदान’ असं सेलिब्रेशन केलं होतं.

पाहा विडिओ :

आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम स्थानावर आहेत. त्यांनी 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.521 असा असून सध्या त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स असून त्यांचा नेट रनरेट +1.104 आहेत. तर तिसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स असून त्यांचा नेट रनरेट हा +0.889 असा आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

ब्रिटनच्या ‘पहिल्या गे वडिलांवर’ बाल लैंगिक गुन्ह्यांचे आरोप:’पती’सह 18 नवीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

0
ब्रिटनमध्ये 'पहिले गे वडील' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक बॅरी ड्रुइट-बार्लो आणि त्यांचे 'पती' स्कॉट ड्रुइट-बार्लो यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे आणि बलात्कार यासह 18...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
spot_img

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
error: Content is protected !!