Homeमनोरंजनविचित्र क्रिकेट रेकॉर्डच्या फलंदाजाने 2 षटकात 94 धावांची नोंद केली

विचित्र क्रिकेट रेकॉर्डच्या फलंदाजाने 2 षटकात 94 धावांची नोंद केली


एक षटकात जास्तीत जास्त धावा असलेले क्रिकेट रेकॉर्डः आयपीएल 2025 ची स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अगदी 111 सारखी सर्वात कमी धावसंख्या उभारुनही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकल्याचं पाहायला मिळालं आहे. तर दुसरीकडे 240 हून अधिकची धावसंख्याही दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने यशस्वीपणे गाठल्याचंही दिसून आलं आहे. या रेकॉर्ड ब्रेकिंग स्पर्धेचे कोट्यवधी चाहते रोज या स्पर्धेतील सामने पाहतात. मात्र आज आपण इथे असा एका विक्रमाबद्दल बोलणार आहोत ज्यासमोर आयपीएलचे सर्वच विक्रम अगदी साधे वाटू शकतात. या विक्रमाची आकडेवारी ऐकून क्रिकेटच्या जाणकारांनाही धक्का बसल्याशिवाय राहत नाही कारण इथं अवघ्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांनी 94 धावा केलेल्या.

एका ओव्हरमध्ये 77 धावा

एका ओव्हरमध्ये सर्व षटकार मारले तर जास्तीत जास्त 36 धावा करता येतात. एखादा बॉल नो वगैरे पडला तर 36 पेक्षाही अधिक धावा करता येतात. मात्र एकाच ओव्हरमध्ये 36 पेक्षाही अधिक धावा झाल्या तर त्यावर विश्वास ठेवणं सहज शक्य होणार नाही. मात्र खरोखर असं झालं होतं जेव्हा एका ओव्हरमध्ये 77 धावा काढण्यात आलेल्या. या ओव्हरमध्ये 8 षटकार आणि 6 चौकार पाहायला मिळालेले. एका प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यामध्ये केवळ 2 ओव्हरमध्ये 94 धावा कुटण्यात आल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती.

कोण होता गोलंदाज आणि फलंदाज?

हा प्रकार 1990 साली घडला होता. क्राइस्ट चर्चेमध्ये कँटरबरी आणि वेलिंग्टनच्या संघादरम्यान प्रथम श्रेणी दर्जाचा सामना खेळवण्यात आलेला. शेल ट्रॉफी स्पर्धेतील या सामन्यामध्ये शेटवच्या दिवशी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये कँटरबरीच्या संघाला जिंकण्यासाठी 95 धावांची गरज होती. सर्वांनाच आता हा सामना कँटरबरीच्या हातून निसटला असून वेलिंग्टन सामना जिंकणार असं वाटत होतं. मात्र एका ओव्हरमुळे सापना पालटला. दबावाखाली गोलंदाजी करणारा वेलिंग्टनचा गोलंदाज बर्ट वेंन्सने  एका ओव्हरमध्ये तब्बल 22 बॉल टाकले. त्यामध्ये 17 नो बॉलचा समावेश होता. या ओव्हरमध्ये फलंदाजांनी तब्बल 77 धावा केल्या. ज्यात 8 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.

एक धाव कमी पडली अन्…

कँटरबरीचा फलंदाज ली जर्मनने 22 बॉलमध्ये 70 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये संघाला जिंकण्यासाठी केवळ 18 धावांची गरज राहिली. मात्र दोन्ही पलंदाजांना केवळ 17 धावा करता आल्याने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 95 ऐवजी 94 धावा झाल्या आणि सामना अनिर्णित राहिला. फलंदाजांनी मोठे फटके मारावेत आणि त्या नादात ते बाद व्हावेत या हेतूने वेंसला गोंलादाजी दिल्याचं कर्णधाराने सामन्यानंतर सांगितलं. मात्र हा डाव वेलिंग्टनच्या संघावरच पलटला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!