HomeमनोरंजनIPL:ऑक्शनमध्ये अनसोल्ड, बदली खेळाडू म्हणून एन्ट्री आणि आता प्लेइंग-11 मध्ये जागा; 2...

IPL:ऑक्शनमध्ये अनसोल्ड, बदली खेळाडू म्हणून एन्ट्री आणि आता प्लेइंग-11 मध्ये जागा; 2 वर्षांनी खेळतोय हा खेळाडू!


चेतन सकारिया: आयपीएल 2025 चा 44 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जातोय. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले. त्यांनी अशा भारतीय वेगवान गोलंदाजाला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले. जो 2 वर्षांनी आयपीएल सामना खेळण्यासाठी आला होता. हा गोलंदाज शेवटचा 2023 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. विशेष म्हणजे केकेआरने चालू हंगामात या गोलंदाजाला बदली खेळाडू म्हणून समाविष्ट केले. कोणीही मेगा लिलावात त्याला घेण्यात रस दाखवला नाही.

टीम इंडियाचा हा बॉलर 2 वर्षांनी आयपीएल सामना खेळण्यासाठी आलाय. आपण डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाबद्दल बोलतोय. 27 वर्षीय साकारिया शेवटचा 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना दिसला होता. चेतनने भारतीय क्रिकेट संघात टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलंय. 2021 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. असे असले तरी त्याने दोन्ही फॉर्मेटमध्ये फक्त 3 सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये दोन आणि एकदिवसीय सामन्यात एक. या सामन्यांमध्ये त्याच्याकडे एकूण 3 विकेट्स आहेत.

बदली खेळाडू म्हणून एन्ट्री

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने चेतन साकारियाला घेण्यात रस दाखवला नाही. तो विकला गेला नाही. अस असताना स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतग्रस्त असल्याने स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर केकेआरने सकारियाला बदली खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केले. या गोलंदाजाचा 75 लाख रुपयांत केकेआर टीममध्ये समावेश करण्यात आला. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील या टीमने त्याला प्लेइंग-11 मध्येही स्थान दिले आहे. या सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये रमणदीप सिंगच्या जागी चेतनला स्थान मिळाले.

राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण

चेतन सकारियाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएल पदार्पण केले. 2021 मध्ये या वेगवान गोलंदाजाने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच 3 विकेट्स घेऊन प्रसिद्धी मिळवली. या पदार्पणाच्या हंगामातच चेतन सकारिया एक मोठा स्टार म्हणून उदयास आला. त्याने राजस्थान रॉयल्सकडून 19 बळी टीपले. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त चेतन दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे.

चेतनची आयपीएल कारकीर्द

या सामन्यापूर्वी चेतन सकारियाने 19 आयपीएल सामन्यांमध्ये 20 बळी घेतले आहेत. या दरम्यान, चेतन सकारियाची इकॉनॉमी 8.44 आणि सरासरी 29.55 आहे. त्याचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा 31 धावांमध्ये 3 विकेट्स आहे. आयपीएलमधील दमदार पदार्पणानंतर चेतन हा टीम इंडियाचा भविष्यातील स्टार असल्याचा दावा केला जात होता. पण त्यानंतर त्याचा खराब फॉर्म दिसून आला. आता चेतन सकारियाला केकेआरने प्लेइंग-11 मध्ये संधी दिलीय. त्यामुळे या सामन्यात चमकदार कामगिरी करण्यासोबतच चेतन केकेआरसाठी आगामी सर्व सामने खेळण्याचा प्रयत्न करेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!