Homeमहाराष्ट्रअजित पवारांकडून फडणवीसांना पुस्तक लिहिण्याचा सल्ला, सुचवलेलं नावही एकदम खास!

अजित पवारांकडून फडणवीसांना पुस्तक लिहिण्याचा सल्ला, सुचवलेलं नावही एकदम खास!


अजित पवार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खास मैत्रीचं नात आहे. त्यांच्यातील मैत्री अनेकदा कॅमेरासमोरही दिसून येत असते. दरम्यान अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहिण्याचा आवाहन केलंय. अजित पवारांनीच या पुस्तकाचं नावदेखील ठरवलंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात जिव गमवावा लागलेल्या निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना यांचा बदला जेवढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घेतला पाहिजे त्यांचा खात्मा केलाच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

‘महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा आपण टिकवला पाहिजे’

महाराष्ट्राला समृद्ध राजकीय आणि वैचारिक परंपरा लाभली आहे. आपल्या राज्याला राजकारणाचा सुसंकृतपणा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे लाभला आहे. सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे विचार कसे मांडले पाहिजेत समाज प्रबोधनाची ताकद कशी असते? हे सगळं आपण यशवंतराव चव्हाण साहेबांकडून शिकलो, असे अजित पवार म्हणाले.  या महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा आपण टिकवला पाहिजे. तो पुढं नेला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. राजकारणात आधी ओलावा होता. जवळीक होती. एकमेकांबद्दल आपुलकी आणि प्रेम होतं. तो जिव्हाळा अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळत नाही, असे ते म्हणाले.माझी जबाबदारी वाढल्यामुळे आता पीडीसीसी बँकेकडे लक्ष देता येत नाही. म्हणून मी संचालक पदाचा राजीनामा दिला. पीडीसीसी बँकेला जागा कमी पडत होती. परवा 58 कोटी रुपये देऊन समोरची पारशी माणसाची एक जागा विकत घेतली आहे. आता बँकेचे बांधकाम सुरू करू असे ते म्हणाले.

पहिल्या भाषणाचा किस्सा

1991 साली पहिल्यांदा मी निवडणूक लढवली. त्यावेळेस भाषण करायला भीती वाटायची. भाषणाचा कुठलाही आणि कसलाही अनुभव नव्हता. फॉर्म भरला आणि दगडूशेठ गणपतीला नारळ फोडून भाषण करायची वेळ आली. मला काहीच बोलता येत नव्हतं. प्रतिभा काकी कुठेतरी लांब थांबून ऐकत होती. मग म्हटलं की जे व्हायचं ते होईल. भाषणाला उठलो म्हटलं की, पवारसाहेब एवढं बोलतात तर आपल्यालाही जमेल आणि आता सगळे बघतायेत की मला काय जमलं’, असे ते पुढे म्हणाले.

1 मे रोजी रॅली

1 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही मोठी रॅली काढली आहे, मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला आम्ही जमणार आहोत. 6 भागातून पाणी आणि माती कार्यकर्त्यांना आणायला सांगितली आहे. त्यादिवशी मुंबईत सभा घेणार असल्याचे ते म्हणाले.

फडणवीसांना पुस्तक लिहिण्याचा देणार सल्ला

यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला. मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायचा सल्ला देणार असल्याचे ते म्हणाले. ‘फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिल आहे. आता तुम्ही दुसरं पुस्तक लिहा. त्याचं नाव ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असं द्या’, असं ते फडणवीसांना उद्देशून म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पीएम मोदी योग | कोलकाता बोट आणि वडोदरा पूल योग; ITBP 14k फूट

0
31 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआज १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यावेळी योगाचे अनेक रंग पाहायला मिळाले. जवानांनी पर्वतांवर, मुलांनी स्वीमिंग पूलमध्ये योग केला....

भानु सप्तमी पूजा: सूर्यदेव मंत्र आणि पद्धत

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज रविवार, 21 जून रोजी भानु सप्तमी आहे. या तिथीला भगवान सूर्याची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारचा कारक...

फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...

महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन्...

0
सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी...
spot_img

फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...

FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...
error: Content is protected !!