Homeदेश-विदेशपाकिस्तान दहशतवादी हल्ला पाकिस्तान एअरस्पेस बंदी भारतीय वाहकांना फ्लाइट ड्युरेशन्स इंधन बर्न...

पाकिस्तान दहशतवादी हल्ला पाकिस्तान एअरस्पेस बंदी भारतीय वाहकांना फ्लाइट ड्युरेशन्स इंधन बर्न आणि खर्चाची माहिती आहे


पहलगम दहशतवादी हल्ला: पहलगाम (Jammu Kashmir) दहशतवादी हल्ल्यानंतर याचा तीव्र निषेध करत भारत सरकारनं पाकिस्तानची धोरणात्मक तत्त्वांवर कोंडी करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. सिंधु जल करारापासून ते अगदी सीमेवरून होणाऱ्या व्यवहारांपर्यंत सर्वत गोष्टींवर भारतानं निर्बंध आणले. ज्यानंतर पाकिस्ताननंही भारताच्या या कारवाईला उत्तर देत असाच एक परिणाम घेतला. जिथं भारताशी असणारं नातं जवळपास संपुष्टात आणण्यासाठी शेजारी राष्ट्रानंही काही घोषणा केल्या.

पाकिस्तानच्या नॅशनल सिक्योरिटी कमिटीनं (NSC) 1972 चा शिमला करार रद्द करत सर्व द्वीपक्षीय करारांवर स्थिगिती आणली. इतक्यावरच न थांबता भारतासाठी पाकिस्ताननं आपली विमानतळं आणि एअरस्पेसही बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. भारताच्या उच्चस्तरीय बैठकीतील निर्णयाचा घाव जिव्हारी लागल्यानंतरच पाकिस्ताननंही भारताला डिवचणारे काही निर्णय घेतले.

विमानतळ, एअरबेस बंद केल्याचा भारतावर कसा परिणाम होणार?

दरम्यान, पाकिस्तानकडून एअरबेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या उड्डाणांवर होताना दिसणार आहे. जिथं दिल्ली, लखनऊ, चंदीगढ आणि अमृतसर यांसारख्या शहरांमधून युरोप, अमेरिका आणि दुबईसह पश्चिम आशियाच्या दिशेनं जाणारी विमानं आता गुजरात किंवा महाराष्ट्राच्या वाटेनं अरबी समुद्राच्या दिशेनं वळवण्यात येतील. या साऱ्यामध्ये प्रवासाचा आणि विमानाच्या उड्डाणाचा वेळ तब्बल 70 ते 80 मिनिटांनी वाढणार आहे.

पाकच्या या निर्णयानंतर आता भारतीय विमानांना इंधनासाठी अधिक रक्कम खर्च करावी लागणार असून, त्यामुळं विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनासुद्धा याचा फटका बसणार आहे. याआधी 2019 मध्ये अनुच्छेद  370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा एअरस्पेस बंद करण्यात आला होता. तेव्हासुद्धा भारतील विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना जवळपास 700 कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता, जिथं एअर इंडियानं अधिक आव्हानांचा सामना केला. परिणामस्वरुप विमानाचे तिकिट दर गगनाला भिडले होते. येत्या काही दिवसांमध्येही असंच चित्र पाहायला मिळू शकतं.

एका प्रतिष्ठित वृत्तसमुहाच्या माहितीनुसार पाकिस्ताननं गतकाळात जेव्हा असा निर्णय घेतला, तेव्हा भारताला दणका देण्याचा त्यांचा हेतू असूनही सर्वाधिक तोटा मात्र पाकिस्तानलाही सोसावा लागला आणि यावेळीसुद्धा परिस्थिती वेगळी नाही. त्यावेळी पाकला एअरस्पेर बंद केल्यानं 50 मिलियन डॉलर म्हणजे साधारण 400  कोटींचं नुकसान झालं होतं. यावेळीसुद्धा परिस्थिती वेगळी नसेल. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता त्यांचाच हा निर्णय नेमका कोणता धडा शिकवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!