Homeमनोरंजनआयपीएल 2025 रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी प्रभाव सब म्हणून खेळल्यानंतर काहीच नाही

आयपीएल 2025 रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी प्रभाव सब म्हणून खेळल्यानंतर काहीच नाही


आयपीएल 2025 प्रभाव प्लेयरवरील रोहित शर्मा: मुंबई इंडियन्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघाविरूद्धचा बुधवारी झालेला सामना मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यामध्ये माजी कर्णधार रोहित शर्माने दमदार फटकेबाजी केली. मात्र या पर्वामध्ये रोहित शर्माला अनेकदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानातून बाहेर बसवण्यात आलं किंवा एकाच इनिंगमध्ये खेळवण्यात आलं. आता याचसंदर्भात रोहितने आपलं मन मोकळं केलं आहे.

इम्पॅक्ट प्लेअर रोहितला पटत नाही

सध्या रोहित शर्मा हा केवळ फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघात खेळत आहे. अर्थात तो हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून निर्णय घेताना मदत करताना दिसतो. मात्र रोहितची प्रमुख जबाबदारी ही सलामीवीर म्हणून खेळण्याची आहे. त्यामुळेच त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरलं जातंय. याबद्दल विचारलं असता रोहितने आपल्याला 2025 च्या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्यास कोणतीही अडचण वाटत नसल्याचं सांगितलं. मुंबईच्या संघाने केवळ फलंदाज म्हणून रोहितला वापरण्याची भूमिका घेतल्याचं अनेक सामन्यांमध्ये दिसून आलं आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला रोहित काही सामने खेळलाही नव्हता. खरं तर रोहितला इम्पॅक्ट प्लेअर ही संकल्पना फारशी रुचत नाही. या गोष्टी क्रिकेटमध्ये असाव्यात का याबद्दल रोहितचं मत फारसं चांगलं नाही.

इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याबद्दल रोहित काय म्हणाला?

“याबद्दल मी आधीही बोललो आहे. 2-3 ओव्हरने सामन्यावर मोठा फरक पडत नाही. तुम्ही पहिले 17 ओव्हर फिल्डींग केली नसेल आणि अचानक तुम्हाला बोलवण्यात आलं तर सामन्याशी जुळवून घेणं कठीण जातं. मात्र माझ्या संघाला मी केवळ फलंदाजी करावी असं वाटत असेल तर मला काहीही हरकत नाही,” असं रोहितने म्हटलं आहे. रोहितने चेन्नईविरुद्धच्या सामनात 76 धावा केल्यानंतर हे विधान केलं. रोहितने कालच झालेल्या सामन्यात हैदराबादविरुद्धही 70 धावांची खेळी केली.

सलग दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी

सनरायझर्सविरुद्धचा सामना मुंबईच्या संघाने 7 विकेट्स आणि 26 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात मुंबईसमोर 144 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. सनरायझर्सच्या संघाची अडखळती सुरुवात झाली. त्यांना आपल्या निश्चित 20 ओव्हरमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यात केवळ 143 धावा करता आल्या. मुंबईच्या संघाने या धावांचा अवघ्या 15.4 ओव्हरमध्ये यशस्वी पाठलाग केला. मुंबईकडून रोहित शर्माने 46 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या. रोहितने या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. रोहितबरोबरच कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद राहत उत्तम फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा केल्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!