Homeमनोरंजनअनया बंगार त्याच्या जुन्या मित्र सरफराज खान आणि मुशीर खान यांना घरी...

अनया बंगार त्याच्या जुन्या मित्र सरफराज खान आणि मुशीर खान यांना घरी घालवतात


अनया बंगार: भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने काही महिन्यांपूर्वी लिंग-बदल शस्त्रक्रिया केली असून यानंतर त्याने स्वतःची ओळख बदलली आणि आता तो आर्यनचा अनाया झाला आहे. बांगर यांच्या मुलाने परदेशात जाऊन हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग-बदल शस्त्रक्रिया केली, त्यानंतर तो आता मुलगी बनला असून यानंतर प्रथमच भारतात आला आहे. अनाया बांगर ही मागील काही दिवसांपासून चर्चेत असून भारतात आल्यावर ती तिचे जुने क्रिकेटर मित्र सरफराज खान आणि मुशीर खान यांच्या घरी पोहोचली. बालपणीच्या मित्रांना भेटून तिला खूप आनंद झाला आणि तिनं यासंदर्भातला व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

अनाया बांगर हिने सरफराज खानच्या घरी पोहोचल्यावर त्याच्या कुटुंबीयांची सुद्धा भेट घेतली आणि ते क्षण अतिशय आनंदात घालवले. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सरफराज खानच्या कुटुंबासोबत मस्ती करताना दिसली. तसेच ती आणि सरफराज दोघे थार कारच्या टपावर सुद्धा बसले होते. यासोबत अनायाने सरफराज आणि मुशीर खान सोबतचा जुना फोटो देखील शेअर केला. यात अनाया ही आर्यन होती. अनायाने फोटोला कॅप्शन देत लिहिले की, आम्ही सुरुवातीपासूनचे मित्र आहोत. आम्ही हातात फोन धरण्यापूर्वी बॅट पकडली होती. सरफराज खान याने 2025 मध्ये भारतीय संघाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. तर त्याचा भाऊ मुशीर खान हा सुद्धा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय.

मुलगी व्हायचंय कधी वाटलं?

अनाया बांगर हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अनायाला विचारण्यात आलं की तुला कधी वाटलं की आपण चुकीचं लिंग निवडलं आहे? यावर अनाया म्हणाली, ‘जेव्हा मी आठ नऊ वर्षांची होते तेव्हा आईच्या कपाटातून तिचे कपडे चोरून घालायचे. मग आरशात पाहून म्हणायचे की मी मुलगी आहे आणि मला मुलगी व्हायचंय. मी मुशीर खान, सरफराज खान, यशस्वी जयस्वाल यांसारख्या युवा क्रिकेटर्स सोबत क्रिकेट खेळलं आहे. मला स्वतःबद्दल गुप्तता पाळावी लागली कारण माझे बाबा क्रिकेटर होते’.

माजी क्रिकेटर्सने पाठवले होते अश्लील फोटो :

अनायाने पुढे म्हटले की, ‘मुलगी झाल्यावर मला समर्थन सुद्धा मिळाले आणि माझा छळ सुद्धा करण्यात आला. काही क्रिकेटर्स असेही होते ज्यांनी मला त्यांचे  गलिच्छ फोटो पाठवले. अजून एक घटना तेव्हा घडली जेव्हा मी भारतात होते, मी एका जुन्या क्रिकेटरला माझ्या स्थितीबद्दल सांगितले होते. तेव्हा त्याने मला सांगितले की, चल कारमध्ये जाऊयात, मला तुझ्या सोबत झोपायचंय’. अनायाने याबाबत सांगताना कोणाचंही नाव घेतलेलं नाही परंतु  एका माजी क्रिकेटरने तिच्या सोबत अशी वर्तवणूक केली होती याबातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!