Homeदेश-विदेश'अब की बार सोनं एक लाख पार'! ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या...

‘अब की बार सोनं एक लाख पार’! ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, वाचा आजचे भाव

देश : आज सोन्याची किंमत: सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून आज 21 एप्रिल रोजी सोनं एक लाखांवर जाऊन पोहोचलं आहे. भारतात कमोडिटी एक्सचेंजनुसार गोल्ड फ्युचर्स सुरुवातीला 1196 रुपयांनी म्हणजे 1.26 टक्क्यांनी उसळले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,450 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर जीएसटीसह सोनं शुद्ध सोने जीएसटीसह 101000 रुपये (एक लाख एक हजार रुपये) प्रति तोळावर पोहोचले आहे. सोन्याच्या दराने आज पुन्हा उच्चांक गाठला आहे.

सोनं एक लाखाच्या पार गेल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. येत्या काहि दिवसांतच अक्षय्यतृतीयेचा सण आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. मात्र त्याआधीच सोन्याने उच्चांकी दर गाठले आहेत. तसंच, एप्रिल-मे महिन्यापासून लग्नसराईला सुरूवात होते. ऐन मुहूर्तावरच सोनं महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यूएस गोल्ड फ्यूचर्स 2 टक्क्यांच्या तेजीसह 3,396 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आह. अमेरिकेच्या डॉलरमध्ये होत असलेली घसरण यामुळं दुसऱ्या चलनाद्वारे सोनं खरेदी करणं स्वस्त होतं. त्यामुळं डॉलरच्या घसरणीचा थेट फायदा सोन्याच्या किंमतीवर पडत असल्याचे समोर आले आहे.

सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं आज 770 रुपयांनी वधारून 98,350 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोनं 90,150 रुपयांवर पोहोचलं असून 18 कॅरेट सोनं 73.760 रुपयांवर पोहोचलं आहे.

काय आहेत सोन्याचे दर!

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  90,150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 98,350 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  73,760 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट  9,015 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,835 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    7,376 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   72,120 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट 78,680 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,008  रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 90,150 रुपये
24 कॅरेट- 98,350 रुपये
18 कॅरेट- 73,760 रुपये. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!