Homeदेश-विदेशनासा मंगळ मिशन पर्सिव्हरेन्स रोव्हरने मार्टियन रॉक गोल्ड खाण वैज्ञानिक त्यांच्या जंगली...

नासा मंगळ मिशन पर्सिव्हरेन्स रोव्हरने मार्टियन रॉक गोल्ड खाण वैज्ञानिक त्यांच्या जंगली स्वप्नांच्या पलीकडे म्हणतात

विदेश : नासा मार्स गोल्डला चिकाटी रोव्हरवर वैज्ञानिक सापडले: अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरच्या माध्यमातून मंगळ ग्रहावरील थक्क करणारी माहिती समोर येत आहे. नव्याने केलेल्या संशोधनामध्ये मंगळ ग्रहावर अनेक लहान-मोठ्या टेकड्या आढळून आल्या आहेत. या माध्यमातून मंगळाच्या भूतकाळावर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे. सध्या ‘नासा’चा हा रोव्हर जेजेरो क्रेटरजवळ भटकंती करुन माहिती गोळा करत आहे. जेजेरो क्रेटर हा भाग पूर्वी एक तलाव होता असं वैज्ञानिकांचं म्हणणं असल्याने या भागातील नवं संशोधन मंगळासंदर्भातील सर्व संकल्पना मोडीत काढणारं ठरु शकतं, असं म्हटलं जात आहे.

मागील चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच…

डिसेंबर महिन्यामध्ये पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावरील एका टेकडीच्या उतारावर भ्रमंती करत होता. या टेकडीला विच हेजल हिल नावाने ओळखलं जातं. मंगळावरील तापमान सध्याच्या तपमानापेक्षा फार वेगळं होतं तेव्हाची गुपितं या टेकडीत दडल्याचं सांगितलं जातं. ‘स्पेस डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही महिन्यांमध्ये या रोव्हरने पाच टेकड्यांवरील दगड, मातीचे नमुने गोळा केले आहेत. या रोव्हरने आतापर्यंत एकूण पाच टेकड्यांचं सविस्तर परिक्षण केलं आहे तर 83 टेकड्यांवर लेझरच्या मदतीने चाचण्या केल्या आहेत. मागील चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच रोव्हरने मंगळवारील लॅण्डींगनंतर इतक्या वेगाने काम केल्याचं, ‘नासा’ने म्हटलं आहे.

सोन्याचा केला उल्लेख

दक्षिण कॅलिफॉर्नियामधील नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेमधील पर्सिव्हरन्स रोव्हरच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या वैज्ञानिक केटी मॉर्गन यांनी एक प्रतिक्रिया नोंदवताना, जेजेरो क्रेटरच्या पश्चिमेकडील भाग हा वैज्ञानिकांसाठी सोन्यासारखा आहे. या ठिकाणी अशा काही टेकड्या आढळून आल्या आहेत ज्या सर्वात आधी मंगळाच्या गर्भातून वर आल्या आहेत. कदाचित येथील टेकड्यांची निर्मिती उल्कावर्षावामुळे झाली असावी. या उल्कांमध्येच जेजेरो क्रेटर तयार करणाऱ्या उल्केचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. या रोव्हरला एक खास टेकडी सापडली असून त्याचं नाव ‘सिलव्हर माऊंटन’ असं आहे. ही टेकडी जवळपास 3.9 अब्ज वर्ष जुनी असू शकते असा अंदाज आहे. ज्यावेळेस मंगळावर मोठ्याप्रमाणात उल्कापात होत होता त्यावेळी या टेकडीची निर्मिती झाली असावी. रोव्हरच्या एक्स अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार, ही टेकडी आतापर्यंतची सर्वात वेगळी टेकडी आहे. या टेकडीपासून जवळच अजून एक टेकडी सापडली असून त्यामध्ये सर्पेंटाइन नावाचं खनिज आहे. पाणी आणि ज्वालामुखी एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा सर्पेंटाइनची निर्मिती होती. या दोघांच्या एकत्र येण्याच्या क्रियेतून हायड्रोजन गॅसची निर्मिती होते. पृथ्वीवरील जीवनासाठी हायड्रोजन आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे या डोंगरांमधून सापडणारे घटक हे वैज्ञानिकांसाठी सोन्याहून कमी नसल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सर्पेंटाइन सापडलेल्या टेकडीचा सोन्याची टेकडी असा उल्लेख आता केला जात आहे. तसेच या टेकडीवरील दगड-मातीचे नमुने हे मानवाला अंतराळात स्थायिक होण्याच्या दृष्टीकोनातून सुरु असलेल्या संशोधनाच्या दृष्टीने सोन्यासारखेच असल्याचं सांगितलं जात आहे.

डेटा एकत्रित करुन संशोधन

मॉर्गन यांनी, “मागील चार आठवडे वैज्ञानिकांसाठी फारच कामाचे ठरले. अजूनही आम्हाला असं वाटतंय की वेच हिलजवळ आपल्याला सांगण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही सध्या रोव्हरने गोळा केलेल्या सर्व डेटाचा एकत्रित वापर करुन पुढील संशोधन करत आहोत,” असं म्हटलं.

हे ‘सोनं’ पृथ्वीवर आणलं तर…

वेच हिलमध्ये अजून बरीच गुपितं लपलेली असल्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. रोव्हर जो डेटा गोळा करत आहे त्यावरुन पुढील संशोधन कोणत्या टेकडीवर करायंच हे ठरवलं जाणार आहे. “मंगळावरील हा प्रदेश वैज्ञानिकांचं कुतूहल वाढवणारा आहे. प्रत्येक पावलावर नवीन टेकडी नवी रहस्य उलगडत आहे,” असं मॉर्गन म्हणाल्या. या टेडक्यांवरील माती, दगडाचे नमुने पृथ्वीवर आणून मंगळावर खरोखरच कधी काळी जीवन अस्तित्वात होतं का हे वैज्ञानिकांना तपासून पाहायचं आहे. मात्र हे काम फार कठीण आहे. यासाठी फार पैसे आणि कालावधी लागणार. नासाकडून यासाठी विशेष प्लॅन आखला जात आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळवारील अनेक रहस्यांवर प्रकाश टाकत आहे. जेजेरो क्रेटरजवळच्या टेकड्या मंगळ पूर्वी कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारही जीवन होतं की नाही हे या संशोधनामधून समोर येईल. खरोखरच ही माहिती समोर आली तर ते मानवासाठी फार मोठं यश असेल. खरंच मंगळावरील जीवनाचं कोडं उलगडलं तर तो दिवस फार दूर नसेल जेव्हा माणूस मंगळावर वस्ती करेल. हे संशोधन एका अर्थाने मानवाला अंतराळामध्ये वस्ती करण्यासाठी लागलेल्या लॉटरीसारखं ठरु शकतं इतकं महत्त्वाचं आहे. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील...

0
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी...

राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या...

7 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळतील, मीन राशीच्या लोकांना प्रॉपर्टी व्यवहार फायदेशीर...

0
मंगळवार, 7 जुलै रोजी कुंभ राशीच्या लोकांना थांबलेली पेमेंट मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी दुपारनंतर...

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....
spot_img

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
error: Content is protected !!