Homeदेश-विदेशFirst Credit Card : कोणाला आला क्रेडिट कार्ड बनवण्याचा विचार? सगळ्यात पहिलं...

First Credit Card : कोणाला आला क्रेडिट कार्ड बनवण्याचा विचार? सगळ्यात पहिलं कार्ड कुठे वापरण्यात आलं?


प्रथम क्रेडिट कार्ड: आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही केवळ एक सुविधा नाही, तर अनेकांसाठी गरज बनली आहे. शॉपिंगपासून ते ट्रॅव्हलिंगपर्यंत, क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातलं पहिलं क्रेडिट कार्ड केव्हा आणि कुणी तयार केलं? खरंतर, यामागची गोष्ट खूपच रंजक आहे. हे कार्ड अमेरिकेतील व्यावसायिक फ्रँक मॅकनामा यांनी त्यांच्या मित्रांसोबत 1950 मध्ये तयार केलं. एकदा ते रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असताना त्यांचं पाकीट विसरल्यामुळे ते बिल भरू शकले नाहीत. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी असं पेमेंट सिस्टीम तयार करण्याचा विचार केला ज्या अंतर्गत रोख रक्कम न देता व्यवहार करता येईल.

यातूनच Diners Club Card ची कल्पना सुरु झाली. हे कार्ड 1951 मध्ये अधिकृतपणे लाँच करण्यात आलं. सुरुवातीला ते फक्त काही निवडक रेस्टॉरंट्समध्येच वापरता येत होतं आणि ग्राहकांना 30 दिवसांची पेमेंट लिमिट मिळत होती.

पहिल्या वर्षात 200 लोकांना हे कार्ड दिलं गेलं आणि वर्षा अखेरीस 20000 कार्ड धारक झाले. हे कार्ड कागदाचं (कार्डबोर्ड) होतं. त्यानंतर 1959 मध्ये अमेरिकन एक्सप्रेसनं पहिलं प्लास्टिक क्रेडिट कार्ड सादर केलं.

1958 मध्ये अमेरिकन एक्सप्रेसने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलं जाणारं कार्ड लाँच केलं. 1966 मध्ये बँक ऑफ अमेरिका नं Visa कार्ड सुरू केलं. IBM च्या अभियंत्यानं 1960 च्या दशकात मॅग्नेटिक स्ट्रिप तयार केली.

आता भारताविषयी बोलायचं झालं तर कधी हे कार्ड भारतात आलं आणि आतापर्यंत किती कोटी खर्च करण्यात आले याविषयी जाणून घेऊया. भारतामध्ये क्रेडिट कार्ड 1980 च्या दशकात आलं. सर्वप्रथम सेंट्रल बँक ऑफ इंडियानं हे सुरू केलं. आज भारतात 10.88 कोटी क्रेडिट कार्ड वापरात असून जानेवारी 2025 मध्ये 1.84 लाख कोटी खर्च झाले आहेत. क्रेडिट कार्ड आता फक्त स्टेटस नाही, तर एक जबाबदार आर्थिक साधन बनलं आहे. ज्यामुळे कधीही कोणाला कुठेही पैशांची अडचण येत नाही.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!