Homeमनोरंजन'पुरुषांना मासिकपाळी आली असती तर युद्ध झालं असतं'; मुलींच्या मूडस्विंगची खिल्ली उडवणाऱ्यांवर...

‘पुरुषांना मासिकपाळी आली असती तर युद्ध झालं असतं’; मुलींच्या मूडस्विंगची खिल्ली उडवणाऱ्यांवर जान्हवी संतप्त


जान्हवी कपूर: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होतात. अनेकदा तिचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. नुकतीच तिनं एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत जान्हवीनं अशा पुरुषांवर टीका केली आहे, ज्यांनी महिलांना मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासाकडे गैरसमज किंवा द्वेषपूर्ण नजरेने पाहतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. या सगळ्याचा महिलांच्या मानसिकतेवर कसा परिणाम करु शकतो याविषयी सांगितलं आहे.

हाउटरफ्लाय या प्लॅटफॉर्मवर बोलताना जान्हवीने सांगितलं की, ‘जेव्हा एखादी स्त्री एखाद्या गोष्टीवर नाराज असते, आपली बाजू मांडते, तेव्हा अनेकदा पुरुष विचारतात, ‘तुला पाळी आलीये का?’  तुम्हाला वाटतं तेवढं ते सोपं नाही. आमचं शरीर ज्या शारीरिक आणि मानसिक अवस्थांमधून जातं, ते खूप गुंतागुंतीचं असतं. पण जर तुम्ही खरोखरच सहानुभूतीशील असाल, तर हे बोलण्याआधी एक मिनिट थांबा. बहुतेक प्रकरणांमध्ये, तुम्हाला एका मिनिटाची आवश्यकता असते कारण ज्या पद्धतीने आपले हार्मोन चार्टच्या बाहेर असतात, त्यामुळे आपण ज्या वेदनांमधून जातो ते खूप कठीण असतं.’

जान्हवीनं मासिकपाळीला काही पुरुषांच्या नजरेत पाहता म्हटलं की हे सगळं विचित्र आहे. कारण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर पुरुषांना मासिक पाळी आली असती, तर ते या वेदना आणि मूड स्विंग एक मिनिटही सहन करू शकले नसते. जर पुरुषांना मासिक पाळी असती तर कदाचित तिसरं महायुद्ध झालं असतं. जान्हीवनं केलेल्या या वक्तव्याची आता सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. स्त्रियांच्या शरीराशी आणि भावनांशी निगडित विषयांवर ज्या सहजतेने टीका केली जाते, ती थांबवण्याची गरज जान्हवीने या मुलाखतीत स्पष्टपणे मांडली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आरोग्याशी संबंधित चर्चा अधिक खुल्या आणि संवेदनशील होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा : मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर…; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी देवाला मानत नाही’

जान्हवीचे गेल्या वर्षी अर्थात 2024 मध्ये तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी एक ‘मिस्टर एंड मिसेज माही’, ‘उलझन’ आणि ‘देवरा पार्ट 1’. आता ती सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याशिवाय तिचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर जान्हवी ‘पेड्डी’ या चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत दिसणार आहे. राम चरण, शिव राजकुमार, दिव्येंदु शर्मा आणि जगपती बाबू या कलाकारांसोबत ती दिसणार आहे. ‘पेड्डी’ 27 मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!