Homeदेश-विदेशCET परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून बळजबरीनं जानवं आणि मनगटावरील रक्षासूत्र काढले; शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल!

CET परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून बळजबरीनं जानवं आणि मनगटावरील रक्षासूत्र काढले; शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल!

देश : कर्नाटक सीईटी परीक्षा वाद: सीईटी परीक्षेवेळी सर्व राज्यांमध्ये अनेक कठोर नियमांचे पालन केले जाते. यामुळे काही राज्यांमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान वादाला तोंड फुटल्याच्या घटना समोर येत असतात.  कर्नाटकातील शिवमोगा येथे सीईटी म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट दरम्यान वाद निर्माण झाला. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना जानवं आणि मनगटावरील धार्मिक धागा काढण्यास सांगण्यात आले. हेच वादाचे मूळ बनले.

शिवमोग्गा येथील आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. सीईटी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रावर येते होते. सर्व परीक्षार्थींची कसून तपासणी सुरु होती. दरम्यान 3 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर थांबवण्यात आले. त्यांच्या अंगावरील जानवं आणि हातावर बांधलेला संरक्षक धागा (कलावा) काढण्यास सांगण्यात आलं.

सीईटी परीक्षेत काय झाले?

गेटवर उपस्थित असलेले सुरक्षा रक्षकांनी परीक्षार्थींची कसून तपासणी करत होते. यावेळी त्यांनी 2 विद्यार्थ्यांना हटकले. कारण त्यांनी जानवं आणि मनगटात धार्मिक धागा बांधला होता. धार्मिक धागा परीक्षेच्या आड येत नव्हता, त्यामुळे आम्हाला परीक्षेला जाऊ द्या, असे विद्यार्थी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षक ते ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. जानवं आणि कलावा काढा तरच प्रवेश मिळेल यावर सुरक्षारक्षक ठाम होते. यातील तिसरा विद्यार्थी धागा न काढण्यावर ठाम होता. त्यामुळे विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांतील वाद वाढत गेला आणि हळुहळू तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले.

ही घटना 16 एप्रिल रोजी घडली. ज्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला सुमारे 15 मिनिटे गेटवर थांबवण्यात आले. अखेर रक्षकांनी त्याच्या हातातील संरक्षक धागा काढला आणि यानंतरच परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. ही माहिती हळूहळू संपूर्ण परिसरात पसरली आणि प्रकरणाला वेगळेच वळण लागले. अखिल कर्नाटक ब्राह्मण सभेने या घटनेचा निषेध केल. त्यांनी तात्काळ जिल्हा दंडाधिकाऱ्यांची (डीएम) भेट घेतली आणि कठोर कारवाईची मागणी केली. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोषींवर त्वरित कारवाई करावी, असा आरोप त्यांनी केला.

पीडितेच्या पालकांनी काय म्हटले?

पीडित विद्यार्थ्याच्या काकांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली. ‘माझा पुतण्या आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेजमध्ये सीईटीसाठी गेला होता. तिथे गार्डने त्याला टी-शर्टच्या आत घातलेलं जानवं आणि मनगटावर बांधलेला  संरक्षक धागा काढण्यास सांगितल्याचे’, ते म्हणाले. धाग्यासह परीक्षा केंद्रात प्रवेश देणार नसाल तर मी परीक्षा देणार नाही, अशी भूमिका पुतण्याने घेतली. यानंतर त्याला 15 मिनिटे बाहेर बसवण्यात आले. नंतर त्याला धाग्यासह परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आल्याची मााहिती त्याच्या काकांनी दिली. यानंतर जानवं घालून त्याला परीक्षेसाठी सोडण्यात आलं. पण त्याच्या हातावरील धागा काढून कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. माझ्या पुतण्याआधी दोन मुलांसोबतही अशाच प्रकारे धागा काढून फेकण्याचा प्रकार घडला होता.

कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री काय म्हणाले?

कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री एम.सी. सुधाकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘असे घडायला नको होते. जर हे घडले असेल आणि दावा केल्याप्रमाणे असेल तर ते निषेधार्ह आहे. मी कार्यकारी संचालकांकडून अहवाल मागितला असल्याचे’, ते म्हणाले. परीक्षांसाठी काही निश्चित प्रोटोकॉल आहेत. जे प्रत्येक संस्था पाळते. पण त्यात जानवं किंवा मनगटातील धागा काढून टाकण्याचा कोणताही उल्लेख नाही. जर तपासात हे खरे ठरले तर विभाग दोषी लोकांवर कारवाई करेल, असेह ते म्हणाले.सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!