Homeमनोरंजनबॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी पडद्यावर करणार होती रोमान्स, पण त्या...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी पडद्यावर करणार होती रोमान्स, पण त्या एका ‘नाही’ने लागली रेखाची वर्णी, सुपरहिट ठरला चित्रपट

मनोरंजन (चित्रनगरी) : बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये कधी आई-मुलगी, सासू-सून किंवा सून-सासरे आणि नवरा-बायको यांनी काम केले आहेत. अगदी बहीण-भाऊ, भाऊ – भाऊ एकाच चित्रपटात प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. सून आणि सासरे ते म्हणजे ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी डान्स फ्लोअरवर आपला जलवा दाखवला आहे. बॉलिवूडमधील हे सून आणि सासऱ्याचं गाण खूप गाजलं होतं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल याच बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी पडद्यावर चक्क रोमान्स करताना दिसणार होते. 29 वर्षांपूर्वी आलेला चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण सासूबाईंच्या त्या एका नाहीमुळे या चित्रपटात रेखाची वर्णी लागली होती.

कोणता होता हा चित्रपट?

आम्ही बोलत आहोत, 1996 मध्ये आलेल्या ‘खिलाडियों के खिलाडी’ या चित्रपटाबद्दल. 6.50 कोटींचा बजेटमध्ये तयार झालेला या चित्रपटाने जगभरात 25.15 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया यांच्यामध्ये रोमान्स होणार होता. पण त्या एका नाहीमुळे रेखाची वर्णी लागली.

एका ‘नाही’मुळे सासू आणि जावयात….

या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात रेखाने अक्षय कुमारसोबत काम केले होते. या चित्रपटात रेखाची नकारात्मक भूमिका होती. हा चित्रपट त्या वर्षीचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. जिथे रेखाने चित्रपटात मॅडम मायाची भूमिका साकारली होती. दुसरीकडे, अक्षय कुमारने अक्षय खरोदिया मल्होत्राची भूमिका साकारली. एवढंच नाही तर चित्रपटात अक्षय कुमार आणि रेखा यांचे अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले होते.

पण तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटातील मॅडम मायाची भूमिका पहिल्यांदा डिंपल कपाडियाला ऑफर करण्यात आली होती. आयएमडीबीच्या मते, डिंपल कपाडियाने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. मात्र, या नकारामागील कारण डिंपल कपाडियाच्या तारखा होत्या. तिने इतर चित्रपटांसाठी तारखा आधीच दिल्या होत्या. ज्यामुळे ती अक्षय कुमारसोबत चित्रपट करू शकली नाही. मात्र, नंतर तिला या निर्णयावर नक्कीच आनंद झाला असेल, कारण जर तिने होकार दिला असता तर तिला अक्षय कुमारसोबत एक रोमँटिक गाणे करावे लागले असते. जे नंतर रेखा आणि अक्षय कुमार यांच्यावर करण्यात आलं होतं.

अक्षय आणि ट्विंकलचे लग्न कधी झाले?

हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अक्षय कुमारचे डिंपल कपाडियाच्या मुलीशी लग्न झालेले नव्हतं. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचं लग्न 2001 मध्ये झाले. पण हा निर्णय अभिनेत्रीसाठी चांगला ठरला. नाहीतर, मला माझ्या जावयाशी इंटिमेट सीन केल्याबद्दल आयुष्यभर पश्चाताप झाला असता, असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!