HomeमनोरंजनShiv Thakare opinion on marathi Language controversy in Maharashtra; 'मराठी बोलण्यास बळजबरी...

Shiv Thakare opinion on marathi Language controversy in Maharashtra; ‘मराठी बोलण्यास बळजबरी करणे चुकीचे, पण…’ भाषेच्या मुद्यावर हे काय म्हणाला शिव ठाकरे?


मराठी बोलण्यावरुन, खाद्यपदार्थांवरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणांहून गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलत नसल्यामुळे अनेक वाद झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे. महाराष्ट्रात राहत असल्यावर तेथील मराठी भाषा ही यायलाच हवी असा आग्रह धरला जात आहे. तसे न झाल्यास अगदी मारहाण झाल्याचाही प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकरणावर शिव ठाकरेने आपलं मत मांडलं आहे.

काय म्हणाला शिव?

आयएएनएसशी झालेल्या मुलाखतीत, शिव ठाकरेने मनसे कार्यकर्त्यांनी लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडल्याच्या अलिकडच्या घटनांबद्दल आपले विचार मांडले आहे. शिवने सांगितले की, “मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, तुम्ही एखाद्याला मारहाण करून किंवा शिवीगाळ करून एखादी भाषा बोलण्यास भाग पाडू शकत नाही.  तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणची भाषा शिकून तुमचा उदरनिर्वाह करण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. मी परदेशात गेलो तरी मला गुगलच्या मदतीने त्यांच्या भाषेत गोष्टींचे भाषांतर करावे लागेल. म्हणून, या गोष्टींबद्दल एक दृष्टिकोन असला पाहिजे.”

शिवचे मत आहे की, लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडण्याची पद्धत चुकीची असली तरी, हेतू योग्य आहे. मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला मराठी येत असले पाहिजे यावर भर देत, तो पुढे म्हणाला की, जर तो इतर राज्यात गेला तर तो त्यांच्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो, किमान दोन ओळी तरी

शिवने पुढे मुलाखतीत सांगितलं की, “जर एखाद्याला तुमची भाषा येत नसेल तर त्याला मारणे योग्य नाही. मला वाटते की, जर मी गुजरात किंवा आसामसारख्या ठिकाणी गेलो तर मी त्यांच्या स्थानिक भाषेतील काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून स्थानिक लोकांना चांगले वाटेल.”

स्वतःचे उदाहरण देत म्हणाला की, “मी अलिकडेच बँकॉकला गेलो होतो, तसेच केपटाऊनला शूटिंगसाठी गेलो होतो, तिथे मी त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला वाटते की, ही पद्धत चुकीची असू शकते, परंतु मुंबईत राहणाऱ्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असा निष्कर्ष त्यांने काढला.

अलीकडेच, मराठीत न बोलल्यामुळे लोकांवर शारीरिक अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत मोठ्या प्रमाणात भाषेचा वाद निर्माण झाला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!