Homeमनोरंजनhow does stent work in the body after heart surgery; हार्ट अटॅक...

how does stent work in the body after heart surgery; हार्ट अटॅक आल्यावर स्टेंटचा वापर का करतात; ‘हे’ स्टेंट शरीरात कसे काम करते?


हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक रुग्णांना योग्य रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्टेंटचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. हृदयाच्या आजारात स्टेंटचा वापर करण्यात येतो. हा बॅालपेनच्या स्प्रिंगच्या आकारासारखा असतो आणि आकुंचन पावलेल्या आर्टरीला दीर्घकाळ उघडी ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो, अशी माहिती डॉ. बिपीनचंद्र भामरे, कन्सल्टंट कार्डियाक सर्जन यांनी दिली आहे.

बैठी जीवनशैली, आहाराच्या चूकीच्या सवयी, ताणतणाव आणि अनुवांशिक घटकांमुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढत आहेत. कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) सारख्या परिस्थिती, जिथे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात किंवा अरुंद होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि जीव गमवावा लागू शकतो. ब्लॉक केलेल्या धमन्यांसाठी सर्वात प्रभावी वैद्यकीय उपचार एक म्हणजे स्टेंट्सचा वापर करणे. अनेक लोकांना स्टेंटबद्दल भिती आणि गैरसमज असल्याचे दिसून येते.

कोणत्या समस्यांसाठी स्टेंटिंग आवश्यक आहे?

कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) असलेल्या रुग्णांसाठी सामान्यतः स्टेंटचा वापर केला जातो. धमन्यांमध्ये ब्लॉक होऊ नये यासाठी स्टेंटची मदत होते. अनेक कार्डियोलॉजिस्ट अँजिओप्लास्टी करताना स्टेंटचा वापर करतात. धातूच्या अतिसूक्ष्म, जाळीदार कॉइल्स म्हणजेच स्टेंट या रक्तवाहिनीच्या उघडलेल्या भागामध्ये टाकल्या जातात. ब्लॉकेज होऊ नये आणि रक्ताभिसरण व्यवस्थितपणे सुरु राहावे यासाठी स्टेंटचा वापर केला जातो. स्टेंटिंगमुळे लक्षणे कमी करता येऊ शकतात आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्याचप्रमाणे, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान किंवा नंतर, रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी आणि हृदयाला होणारे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी स्टेंट बसवता येतो. पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) असलेल्यांमध्ये देखील तज्ञ स्टेंटिंगचा पर्याय सुचवतात. काही प्रकरणांमध्ये, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी शरीराच्या इतर भागांमध्ये, जसे की पायांमध्ये अरुंद रक्तवाहिन्यांवर उपचार करण्यासाठी स्टेंटचा वापर केला जाऊ शकतो.

स्टेंटिंगचे फायदे

रक्तप्रवाह संतुलित करणे: स्टेंट्स ब्लॉक केलेल्या धमन्या उघडण्यास मदत करतात, ज्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत कार्यक्षमतेने पोहोचते आणि रक्त पंपिंग करण्याची क्रिया सुरळीतपणे होते

हृदयविकाराचा झटक्याचा धोका रोखते: धमन्या उघड्या ठेवून, स्टेंट्स जीवघेण्या हृदयविकाराचा धोका कमी करतात

छातीत दुखण्यापासून आराम मिळतो: गंभीर एनजाइना असलेल्या रुग्णांना स्टेंटिंग प्रक्रियेनंतर तात्काळ आराम मिळतो.

मिनीमली इव्हेसिव्ह प्रक्रिया: ओपन-हार्ट सर्जरीच्या विपरीत, स्टेंटिंगसाठी फक्त एक लहान छिद्र पाडून केले जाते. त्यामुळे रुग्ण जलद बरा होतो.

गुणवत्ता सुधारते: सुरळीत झालेल्या रक्ताभिसरणामुळे, रुग्णाची अस्वस्थता कमी होऊन हृदयाचे कार्य सुधारते व  दैनंदिन कामांना पुन्हा सुरूवात करता येते.

स्टेंटिंगनंतर काय खबरदारी घ्याल?

गुंतागुंत टाळण्यासाठी रुग्णांना तज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ करणारी आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधांचे सेवन करणे आवश्यक आहे. ही औषधे मध्येच घेणे थांबवू नका. निरोगी व पोषक आहार घ्या. प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन टाळा. फळे, भाज्या, तृणधान्य आणि प्रथिनांच्या सेवनाने धमनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. चालणे किंवा योगासारख्या शारीरिक हालचाली केल्यानेही हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पुरेशी झोप घेतल्याने हृदयावरील ताण कमी होऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि स्टेंट योग्यरित्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!