मध्यम श्रेणी कार: एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी करायचं म्हटलं की अनेकदा मध्यमवर्गीय कुटुंबांकडून आर्थिक गणितांची आकडेमोड हमखास केली जाते. त्यातही मुद्दा जेव्हा कार खरेदीवर येऊन थांबतो तेव्हा आपण मोजत असणाऱ्या किमतीत कुटुंबाच्या आवडीची, पुरेशी जागा असणारी आणि चांगलं मायलेज देणारी कार खरेदी करण्यालाच अनेकजण प्राधान्य देतात. खिशाला फारशी चणचण सोसावी लागणार नाही, हा मुख्य हेतूसुद्धा अनेकदा साध्य करण्याचा प्रयत्न इथं होत असतो. अशा सर्वच अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या कार कोणत्या? पाहायचंय?
मारुती सुझुकी अल्टो के 10
मध्यमवर्गीय कुटुंबासाठी Alto K10 ही एक उत्तम कार. ₹4.00 लाख ते ₹5.96 लाख इतक्या किमतीत ही कार उपलब्ध असून, मायलेजच्या बाबतीतही ही कार अपेक्षाभंग करत नाही. 24-25 kmpl इतकं मायलेज देणारी ही कार 1.0L पेट्रोल इंजिन आणि सीएनजी वर्जनमध्येही उपलब्ध आहे. 7 इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम असणाऱ्या या कारला ड्युअल एअरबॅग्स आणि ABS फिचर्सही देण्यात आले आहेत.
रेनॉल्ट क्विड
दुसरा मिडरेज कास. भारतात. 21-22 केएमपीएलमध्ये 70.70० लाख ते million 6 दशलक्ष ते .4..45 लाख किंमती उपलब्ध आहेत.
टाटा टियागो
टाटाची ही कार भक्कम मॉडेलमुळं ओळखली जाते. Tata Tiago सुरक्षिततेच्या निकषांमध्ये सर्व अपेक्षा पूर्ण करत असून, ही कार ₹5.60 लाख ते ₹8.20 लाखांमध्ये उपलब्ध आहे. 20-26 kmpl इतकं मायलेज देणारी ही कार पेट्रोल आणि सीएनजी वर्जनमध्येही उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी एस-पासो
मायक्रो SUV च्या यादीत गणली जाणारी ही कार ₹4.25 लाख सते ₹6.10 लाख रुपये इतक्या किमतीला उपलब्ध असून ती 24-26 kmpl इतकं मायलेज देते. 1.0L पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारला हाय ग्राऊंड क्लिअरंस देण्यात आलं असून, प्रवासाचा कमाल अनुभव ही कार देते.
ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस
प्रिमियम लूक आणि खिशाला परवडणारा दर असा पर्याय ही कार उपलब्ध करून देत असून, कारची किंमत ₹5.92 लाख ते ₹8.56 लाख रुपयांच्या घरात आहे. या कारमध्ये 20-25 kmpl मायलेजची क्षमता असून, ती सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

































