Homeदेश-विदेशसूटकेसमध्ये वसतिगृहाच्या सभोवतालच्या गर्लच्या व्हायरल व्हिडिओवरील हरियाणा ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी

सूटकेसमध्ये वसतिगृहाच्या सभोवतालच्या गर्लच्या व्हायरल व्हिडिओवरील हरियाणा ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी


सूटकेसमध्ये वसतिगृहातील गर्लचा व्हायरल व्हिडिओः हरियाणामधील सोनीपतमधील ओपी जिंदल युनिव्हर्सिटी सध्या भारतभरात चर्चेत आहे ती या शैक्षणिक संस्थेमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी हॉस्टेलच्या पॅजेसमध्ये एका सूटकेसमधून बाहेर पडताना दिसत आहे. एक तरुण आपल्या प्रेयसीला मुलांच्या हॉस्टेलमध्ये लपून घेऊन जात असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओसंदर्भात करण्यात आला. मात्र आता या प्रकरणावर शैक्षणिक संस्थेनं आपली बाजू मांडताना सत्य समोर आणलं आहे.

काय म्हटलं आहे शैक्षणिक संस्थेनं याबद्दल?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने स्पष्टीकरण देताना हा संपूर्ण प्रकार म्हणजे एक प्रँक होता असं म्हटलं आहे. “मुलींच्या हॉस्टेलमध्येच काही विद्यार्थिनींनी जाणूनबुजून हा प्रँक गंमत म्हणून केलेला,” असं कॉलेजने म्हटलं आहे. मात्र हे प्रकरण कॉलेज प्रशासनाने गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थिनींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थिनींना शिस्तपालन समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं कॉलेजने स्पष्ट केलं आहे.

व्हिडीओत काय आहे?

विद्यार्थ्यांची सुरक्षा ही विद्यापीठासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचं प्रवक्त्यांनी रविवारी म्हटलं आहे. “या प्रकरणामध्ये आम्ही तातडीने आणि परिमाणकारक कारवाई केली आहे,” असंही प्रवक्त्यांनी सांगितलं. शुक्रवारी ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महिला सुरक्षारक्षक हॉस्टेलच्या पॅसेजमध्ये एक सूटकेस उघडून तपासणी करत असताना त्या सूटकेसमधून चक्क एक तरुणी बाहेर पडताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आता शिक्षण संस्थेनं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

सोशल मीडियावरील दावे…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुलांच्या हॉस्टेलमध्ये एकाने आपल्या प्रेयसीला बॅगमध्ये लपवून आणलं होतं असा दावा करण्यात आलेला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण संस्थेतील सुरक्षेसंदर्भात अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळेच आता या संस्थेनं स्पष्टीकरण देताना हा सारा व्हिडीओ मुलींच्या हॉस्टेलमध्येच काही विद्यार्थिनींनी गंमत म्हणून शूट करुन व्हायरल केल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल होणारे दावे खोटे असल्याचं या विद्यापीठाने म्हटलं आहे.

त्या विद्यार्थिनींना नोटीस

बॅगमध्ये बसून या विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीला फिरवत होत्या. त्यानंतर त्या सर्वजणी ही सूटकेस घेऊन हॉस्टेलच्या कॉरिडोअरमध्ये गेल्या. हा भाग सीसीटीव्ही क्षेत्राअंतर्गत येतो. सुरक्षारक्षकांना या बॅगेतून मुलीचा आवाज आल्यानंतर त्यांनी ही बॅग उघडून तपासली आणि त्यामधून एक तरुणी बाहेर पडली. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने, “मुलींच्या हॉस्टेलमध्येच गंमत म्हणून हा सारा प्रकार विद्यार्थिनींनी केला. मात्र हे सारं सार्वजनिक पॅसेजमध्ये घडलं. या प्रकरणातील सर्व विद्यार्थिनींना नोटीस पाठवम्यात आली असून त्याच्यावर शिस्तपालन समितीकडून कारवाई केली जाणार आहे. विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे,” असं अधोरेखित केलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!