Homeदेश-विदेशभारत प्रत्यार्पणाच्या विनंतीवर पीएनबी १8850० कोटी कोटी घोटाळा फरारी डायमंड व्यापारी मेहुल...

भारत प्रत्यार्पणाच्या विनंतीवर पीएनबी १8850० कोटी कोटी घोटाळा फरारी डायमंड व्यापारी मेहुल चोकसी बेल्जियममध्ये अटक

देश-विदेश :13850 कोटी रुपये बेल्जियममध्ये अटक केली: भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईवर झालेल्या 26/11 या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागचा खरा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेमधून भारतात आणल्यानंतर आता भारत सरकारच्या गळाला लवकरच आणखीन एक मोठा मासा लागणार आहे. मागील सात वर्षांपासून देशातून फरार असलेला आणि तब्बल 13 हजार 850 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात वॉन्टेंड असलेल्या आरोपीला परदेशात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारताने प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर या आरोपीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. ज्या आरोपीबद्दल आपण बोलत आहोत त्याचं नाव आहे, मेहुल चोक्सी! त्याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे.

सीबीआयच्या विनंतीवरुन कारवाई

पंजाब नॅशनल बँकेतील 13850 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली हवा असलेला मेहुल चोक्सी त्याची पत्नी प्रीती चोक्सीसह बेल्जियममधील अँटवर्पमध्ये राहत आहे. मेहुलला अटक करण्यात आल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला असून सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विनंतीवरून 65 वर्षीय मेहुल चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे, असे ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

जामीनासाठी प्रयत्न करण्याची शक्यता

पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन ओपन-एंडेड अटक वॉरंटचा संदर्भ दिला आहे. ही वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मात्र आता भारताच्या मागणीनुसार बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर चोक्सी प्रकृती अस्वस्थ्य असण्याचं कारण देत किंवा इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटकेची मागणी करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता तो या छोट्याश्या देशाचा आहे नागरिक

पंजाब नॅशनल बँकेतील 13850 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली हवा असलेला चोक्सी आता अँटिग्वा आणि बारर्म्युडा नागरिक आहे. छोटं बेटवजा राष्ट्र असलेल्या अँटिग्वा आणि बारर्म्युडावरुन चोक्सी वैद्यकीय उपचारांसाठी हा देश सोडून बेल्जियममध्ये गेला असल्याची माहिती समोर येत आहे. चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सह-आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधून प्रत्यार्पणाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर येत आहे.

घोटाळा समोर येण्याच्या काही आठवडे आधीच पळाला

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच पंजाब नॅशनल बँकमध्ये या काका-पुतण्याने केलेला घोटाळा उघडकीस येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2018 मध्ये दोघांनी भारतातून पळ काढला होता. त्यानंतर पहिल्यांदाच चोक्सीला अटक करण्यात आली आहे. हे भारतासाठी मोठं यश असल्याचं मानलं जात आहे. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!