Homeमहाराष्ट्रमुंबईहून पुण्याला जाण्यासाठी लवकरच नवा रेल्वे मार्ग; नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणार

मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी लवकरच नवा रेल्वे मार्ग; नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणार


Karjat Lonavala Pune Railway: मुंबई-पुणे प्रवास आता आणखी जलद होणार आहे. रेल्वे लवकरच दोन सविस्तर प्रकल्पाची आखणी करणार आहे. कर्जत ते लोणावळ्यादरम्यान  दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेने तयार केले असून ते रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

मुंबईवरून पुण्याला जाणारा सर्वाधिक वाहतूक असलेला हा मार्ग आहे. हा मार्ग झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेल ते कर्जतच्या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग होत आहे. हा मार्ग लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळं कर्जत ते लोणावळा मार्गिका प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कर्जत-लोणावळा भागातील मार्गासाठी दोन प्रस्ताव तयार केले आहेत. तसंच नवीन मार्गांबरोबरच नवी स्थानकेही उभारण्यात येणार आहे.

नवीन मार्गावर चढ-उतार नसल्याने रेल्वेला अतिरिक्त बँकर इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. बँकर जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी लागणारा 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. तसंच, या प्रकल्पात भुयारी मार्ग आणि पुलांचा समावेश असणार आहे. एकेरी बोगदे असून त्यातून दोन्ही मार्गिका जातील तर काही ठिकाणी दोन्ही मार्गिकांसाठी स्वतंत्र बोगदे असतील.

सध्याचा मार्ग हा 26 किमीचा असला तरी नवीन मार्ग साधारण दुप्पट लांबीचा असेल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणेदरम्यान अतिरिक्त मार्गिका तयार होणार असून सेवांमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे.

कर्जत ते तळगाव असा एक प्रस्ताव असून याची लांबी एकूण 60 किमी आहे. त्यात 4 बोगदे, एकूण पूल 24 आणि 6 स्थानके असणार आहेत. तर कर्जत-खोरावडी असा दुसरा प्रकल्प असून तो मार्ग 61 किमी आहेत. एकूण बोगदे 4 तर 20 पूल असणार आहेत तर 6 स्थानके त्यात बांधण्यात येणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!