Homeदेश-विदेशबांगलादेश हिंसाचाराने स्पष्ट केले

बांगलादेश हिंसाचाराने स्पष्ट केले


बांगलादेशने बाटा, पिझ्झा हट, केएफसी आउटलेट्सवर हल्ला का केला: बांगलादेशमध्ये दिवसोंदिवस परिस्थिती चिघळत चालली आहे. मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारने देशातील अनेक प्रश्नांकडे कानाडोळा केल्याची जगभरात चर्चा आहे. अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवरील हल्ल्यांनंतर आता जहाल बांगलादेशींनी अनेक अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दुकानांवर हल्ले सुरु केले आहेत. जहाल मतवादी बांगलादेशी तरुणांनी आता चप्पल आणि बूट विकणाऱ्या जगप्रसिद्ध ‘बाटा’ ब्रॅण्डबरोबरच ‘पिझ्झा हट’ आणि ‘केएफसी’च्या आऊटलेटवर हल्ले करुन तेथील खाण्याच्या तसेच वापराच्या वस्तूंवर डल्ला मारला आहे. मात्र या परदेशी ब्रॅण्ड्सवर अचानक बांलगादेशी तरुण हल्ले का करु लागलेत हे अनेकांना ठाऊक नाही त्याबद्दलच जाणून घेऊयात…

…म्हणून अनेक परदेशी कंपन्यांच्या दुकानांवर दगडफेक

गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्याविरोधात बांगलादेशमध्ये परदेशी ब्रॅण्ड्सला लक्ष्य केलं जात आहे. या ब्रॅण्ड्सवर बहिष्कार टाकण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांनी अनेक परदेशी ब्रॅण्ड्सचं कथित इस्रायल कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. बुधवारी झालेल्या विरोध प्रदर्शनामध्ये अनेक शहरांमध्ये आंदोलन हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक परदेशी कंपन्यांच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तसेच या दुकानांची तोडफोड करुन त्यामधून सामान आंदोलनकर्त्यांना पळवलं

मोदींनी दिलेला इशारा

मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारने या हल्ल्यांना निषेध केला असला तरी या हल्ल्यांना सरकारचीच फूस असल्याचं चर्चा आहे. शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर बांगलादेशमधील स्थिती मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारच्या नेतृत्वाखाली दिवसोंदिवस अधिक भयानक होत चालली आहे. भारताचीही बांगलादेशमधील घडामोडींवर बारीक नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच मोहम्मद यूनुस यांच्या हंगमी सरकारला बांगलादेशमधील परिस्थितीवरुन सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र या सल्ल्यानंतर काही दिवसांमध्येच आता परदेशी कंपन्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे प्रकार भारताचा शेजारी असलेल्या देशात घडत आहेत.

…तर बांगलादेश पुढील अफगाणिस्तान होईल

बांगलादेशमधील आवामी लीगने या हल्ल्यांसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना, “हे केवळ राजकीय संकट नाही. ही राष्ट्रीय आणीबाणी आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावरुन यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही यावर त्यांनी काही भाष्य केलं नाही तर बांगलादेश पुढील अफगाणिस्तान होईल,” अशी भीती व्यक्त केली आहे. पक्षाने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यासाठी मोहम्मद यूनुस यांचे हंगामी सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच परिस्थिती सामान्य व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भारतासाठी धोक्याचं

भारताबरोबर मागील काही महिन्यांपासून बांगलादेशचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. शेख हसिना यांना सत्तेतून खाली खेचल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी केलेली काही विधाने ही भारतविरोधी असल्याचं मानलं जात आहे. ईशान्य भारताला उल्लेख लॅण्डलॉक असा करुन युनूस यांनी त्यांची चीनबरोबरची जवळीक वाढल्याचं अधोरेखित केलं असून यामुळे भारताची चिंता वाढली आहे. व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांलगादेशसारखा शेजारी खदखदत राहणे भारतासाठी धोक्याचं ठरु शकतं.

‘बाटा’ने तोडफोडीनंतर स्पष्ट केली भूमिका

बांगलादेशमधील आऊटलेटची तोडफोड झाल्यानंतर ‘बाटा’ने अधिकृत पत्रक जारी केलं आहे. यामध्ये, “आम्हाला त्या खोट्या दाव्यांची कल्पना आहे ज्यामध्ये बाटा ही इस्रायलचा मालकी हक्क असणारी कंपनी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कंपनीचा इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षाशी संबंध असल्याचा दावाही चुकीचा आहे. बाटा ही खासगी कंपनी असून तिचा संपूर्ण मालकी हक्क कुटुंबाकडे आहे. बाटाची स्थापना झेक प्रजासत्ताक या देशात झाली आहे. याचा संघर्ष आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमच्या काही दुकानांची तोडफोड करण्यात आली हे फारच संतापजनक आहे. जे काही घडलं ते खोट्या दाव्यांमुळे घडलं,” असं कंपनीने म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!