Homeमनोरंजननवीन आयात कर टाळण्यासाठी Apple पलने आयफोनची 5 पूर्ण विमाने अमेरिकेत पाठविली

नवीन आयात कर टाळण्यासाठी Apple पलने आयफोनची 5 पूर्ण विमाने अमेरिकेत पाठविली


Apple पलने आयफोनची 5 विमाने पाठविली: जगभरामध्ये सध्या चर्चा आहे ती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसं धोरणाप्रमाणे लागू केलेलं टॅरिफ! ट्रम्प यांनी नवे टॅरिफ दर जाहीर केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये पडझड दिसून आली. या नव्या करधोरणामध्ये अडकून अधिक पैसे मोजावे लागू नये म्हणून जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीने मागील तीन दिवसांमध्ये एक मोठा निर्णय घेत तो अंमलात आणला.

पाच विमानं भरुन आयफोन अमेरिकेत नेले

अ‍ॅपल कंपनीची निर्मिती असलेले आणि भारतात तयार होणारे आयफोन आणि इतर इलेक्ट्रीक उपकरणं नवीन कर लागू होण्याआधीच अमेरिकेत नेण्यात आली. भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर मोठ्याप्रमाणात टॅरिफ लावलं जाणार असल्याने आर्थिक फटका बसू नये म्हणून अ‍ॅपलने हा निर्णय घेत अंमलात आणला. पाच विमानं भरुन आयफोन आणि इतर इलेक्ट्रीक उपकरणं भारतातून अमेरिकेत नेण्यात आली आहे.

…म्हणून घेण्यात आला मोठा निर्णय

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे सर्व सामान अमेरिकेत पाठवण्यात आलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लागू करण्यात आलं. 5 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलेलं. या नव्या कर धोरणानुसार भारतातून अमेरिकेत सामान घेऊन जाण्यासाठी कंपनीला अधिक पैसे खर्च करावे लागले असते. हेच अतिरिक्त पैसे भरण्याचं टाळण्यासाठी, अ‍ॅपल कंपनीने भारत आणि चीनमध्ये तयार करण्यात आलेले प्रोडक्ट्स अमेरिकेतली गोदामांमध्ये ठेवण्यासाठी पाठवून दिले. सामान्यपणे या कालावधीमध्ये कंपनी मोठ्याप्रमाणात अमेरिकेत सामान आणि प्रोडक्ट्स पाठवत नाही मात्र करासंदर्भातील गोंधळामुळे यंदा हा मोठा निर्णय घेण्यात आला.

…तर आयफोन महागणार

तयार प्रोडक्ट जास्तीत जास्त प्रमाणात जुन्या कर प्रणालीनुसार मायदेशी आणण्याच्या हेतूने अ‍ॅपलने हा निर्णय घेतला आहे. या खेपेला अमेरिकेत नेलेले प्रोडक्टस कंपनी आहे त्या रक्कमेला विकू शकते. किमान स्टॉक असेपर्यंत तरी अ‍ॅपलला या दरात प्रोडक्टस विकता येतील. यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार पडणार नाही. भारतात तसेच इतर देशांमध्ये प्रोडक्टसची किंमत वाढवण्याचा सध्या कंपनीचा कोणाताही विचार नाही. मात्र टॅरिफ असाच वाढत राहिला तर किंमत नक्कीच वाढेल असं सांगितलं जात आहे.

चीनपेक्षा भारत परवडला

अ‍ॅपलच्या निर्मितीसंदर्भातील धोरणांमध्ये भारताला विशेष महत्त्व आहे. 9 एप्रिलपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के कर आकारला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात अ‍ॅपल कंपनी ही चीनपेक्षा भारतावर अधिक अवलंबून राहील असं सांगितलं जात आहे. यामागील कारण म्हणजे चीनवर अमेरिकेने 104 टक्के कर लादला असून भारतावर 26 टक्के कर लादण्यात आला आहे. यामुळेच अ‍ॅपलसाठी भारत हा पहिला पर्याय असेल यात शंका नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!