Homeमनोरंजन11 लाखांची अंतर्वस्रं, विमानात 'बेडवर ये' म्हणाली अन्...; झुकरबर्गच्या खास व्यक्तीवर गंभीर...

11 लाखांची अंतर्वस्रं, विमानात ‘बेडवर ये’ म्हणाली अन्…; झुकरबर्गच्या खास व्यक्तीवर गंभीर आरोप


फेसबुक माजी कर्मचार्‍यांकडून धक्कादायक दावाः फेसबुकच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शेर्ली सॅण्डबर्ग यांच्यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शेर्ली सॅण्डबर्ग यांनी स्वत:साठी आणि त्यांच्या 26 वर्षीय महिला सहाय्यकासाठी युरोप दौऱ्याआधी तब्बल 11 लाख 30 हजार रुपये लिंगरीजवर (महिलांची अंतरवस्रांवर) खर्च केले होते. याहून अधिक थक्क करणारी बाब म्हणजे शेर्ली सॅण्डबर्ग यांनी घरी परत येताना वापरलेल्या खासगी जेटमध्ये महिला सहाय्यकाला ‘बेडवर ये’ असंही सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

कुठे केला आहे हा दावा?

फेसबुकची माजी कर्मचारी आणि शेर्ली सॅण्डबर्ग यांची माजी सहाय्यक सारा विन-विल्यम्सनेच हे दावे केले आहेत. साराने शेर्ली सॅण्डबर्ग यांच्यासंदर्भातील धक्कादायक दावे एका पुस्तकातून केले आहेत. साराने लिहिलेल्या ‘केअरलेस पीपल: अ कॉशनरी टेल ऑफ पॉवर, ग्रीड अॅण्ड लॉस्ट आयडीएलिझम’ या पुस्तकामध्ये शेर्ली सॅण्डबर्ग यांच्याबरोबर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. फेसबुकमध्ये कार्यरत असताना शेर्ली सॅण्डबर्ग मार्क झुकरबर्गच्या निकटवर्तीय होत्या.

ही लेखिका आहे तरी कोण?

साराने 2011 पासून 2017 दरम्यान सहा वर्ष फेसबुकमध्ये काम केलं. सहा वर्षानंतर साराने फेसबुक कंपनीला सोडचिठ्ठी दिली. साराने केलेल्या दाव्यानुसार, युरोप दौऱ्यादरम्यान कारमधून फिरताना शेर्ली सॅण्डबर्ग आणि त्याचा सहकारी कारमध्ये एकमेकांच्या मांडीवर डोकं ठेऊन पडायचे. यावेळी बसलेली व्यक्ती मांडीवर पडलेल्या व्यक्तीच्या केसांमधून हात फिरवत गोंजारायची, असा दावाही या माजी कर्मचाऱ्याने केला आहे.

बेड शेअर करण्यास नकार दिल्याने…

‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील पुस्तक परीक्षणामध्ये साराने पुस्तकात, ‘शेर्ली सॅण्डबर्ग यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यासाठी (सारासाठी) लिंगरीज खरेदी करण्यासाठी सारालाच पाठवलं होतं. यावेळी अंतरवस्रांचं बील 13 हजार अमेरिकी डॉलर इतकं झालं होतं,’ असा दावा करण्यात आला आहे. खासगी विमानाने परत येत असतानाच त्या विमानात एकच बेड उपलब्ध होता. त्यामुळे शेर्ली सॅण्डबर्ग यांनी साराला बेड शेअर करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याला साराने नकार दिल्याने शेर्ली सॅण्डबर्ग चांगल्याच वैतागल्याचा दावा पुस्तकात केल्याचं पुस्तक परीक्षणात म्हटलं आहे.

या आरोपांवर फेसबुकने आता काय म्हटलंय?

मात्र फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या ‘मेटा’च्या अधिकाऱ्यांनी साराने केलेले दावे हे, ‘कालबाह्य आणि यापूर्वी समोर आलेल्या माहितीचं हे मिश्रण असून यामध्ये कंपनीबद्दल खोटी माहिती पसरवण्यात आली आहे,’ असं म्हटलं आहे. तसेच मेटाच्या अधिकाऱ्यांनी साराला कंपनीने आठ वर्षांपूर्वीच कामावरुन काढून टाकल्याचंही म्हटलं आहे. ‘वाईट कामगिरी आणि विष पेरणारी वागणूक’ यामुळे साराला कामावरुन काढून टाकलेलं, असा दावा मेटाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यावेळी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये साराने केलेले दावे हे चुकीचे आणि दुर्देवी असल्याचं तपास समितीने म्हटलं होतं, अशी आठवणही ‘मेटा’च्या अधिकाऱ्यांनी करुन दिली आहे.

मार्क झुकरबर्गचा प्रवास एक व्यक्ती म्हणून,,,

फेसबुकविरोधी कॅम्पेन करणारे तेव्हापासूनच साराला आर्थिक पाठबळ देत असून तिचं नवं पुस्तक हे याच उद्देशाने प्रकाशित करण्यात आल्याचं, मेटाचं म्हणणं आहे. द टाइममधील लेखानुसार, साराने मार्क झुकरबर्गचा प्रवास एक व्यक्ती म्हणून इंजिनिअरिंग आणि कोडींबद्दल प्रेम असणारी व्यक्ती ते राजकारण आणि लोकप्रियतेमुळे हुरळून गेलेली व्यक्ती असा झाल्याचा दावा करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

कोर्टाने शेर्ली सॅण्डबर्ग यांना दिलेला इशारा

शेर्ली सॅण्डबर्ग आणि मार्क झुकरबर्ग हे ‘केअरलेस पीपल’ आहेत, असं साराचं म्हणणं आहे. आपल्या वागण्याचे परिणाम दुसऱ्यांनी भोगावेत अशी या लोकांची भूमिका असल्याचंही साराने म्हटलं आहे. जानेवारी महिन्यामध्येच कोर्टाने शेर्ली सॅण्डबर्ग यांना फेसबुकच्या केंब्रिज अॅनलिटीका प्रायव्हसी प्रकरणाशीसंबंधित ईमेल डिलिट केल्यावर झापलं होतं. हा डेटा जपून ठेवण्याचे निर्देश कोर्टाने शेर्ली सॅण्डबर्ग यांना दिले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

यावेळी युरोप नाही, आशिया बनला भारतीयांची पसंती:थायलंड-व्हिएतनाम-जपानची बुकिंग वेगवान, युरोपमधील महागड्या विमानांमुळे प्रवासाचा ट्रेंड...

0
यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय पर्यटक युरोपऐवजी आशियाई देशांना भेट देणे अधिक पसंत करत आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे युरोपला जाणाऱ्या विमानांचे महागडे भाडे,...

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!