HomeमनोरंजनAI च्या शर्यतीत ChatGPTची उंच भरारी; लवकरच मिळणार व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय

AI च्या शर्यतीत ChatGPTची उंच भरारी; लवकरच मिळणार व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय

मनोरंजन (टेक):

मुक्त तयारी

ओपन एआयने आधीच Sora नावाचा एक टेक्स्ट-टू-व्हिडिओ मॉडेल लाँच केला आहे, जो सध्या त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. मात्र, आता कंपनी हा सोरा मॉडेल थेट ChatGPT मध्ये आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे युजर्सना केवळ चॅटबॉटकडून उत्तर मिळवण्याऐवजी थेट व्हिडिओ जनरेट करण्याची सुविधाही मिळू शकते.

ओपन एआय अधिकाऱ्यांचे वक्तव्य

ओपन एआय च्या Sora प्रोडक्टचे प्रमुख रोहन सहाय यांनी याबाबत एक मोठा संकेत दिला आहे. त्यांनी सांगितले की, सोरा मॉडेलला ChatGPT मध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही तारीख नक्की झालेली नाही. सहाय म्हणाले की, ChatGPT मधील सोरा व्हर्जनमध्ये वापरकर्त्यांना मूळ वेबसाइटच्या तुलनेत कमी कंट्रोल मिळू शकतो. म्हणजेच, स्वतंत्र Sora वेबसाइटवर अधिक सखोल सेटिंग्ज व पर्याय असतील, तर ChatGPT मध्ये त्याचे थोडे साधे व्हर्जन असेल.

Sora स्वतंत्र का लाँच करण्यात आला?

रोहन सहाय यांनी स्पष्ट केले की, ‘ChatGPT मध्ये आणखी फीचर्स जोडल्याने तो जास्त अवघड होईल, त्यामुळेच Sora ला स्वतंत्र ठेवण्यात आले होते. मात्र, आता AI क्षेत्रातील स्पर्धा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे OpenAI व्हिडिओ जनरेशन फीचरचा ChatGPT मध्ये समावेश करून इतर स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे येण्याच्या तयारीत आहे’.

चीनच्या कंपन्यांमुळे वाढलेली स्पर्धा

गेल्या काही महिन्यांत चिनी एआय कंपन्यांनी अनेक अत्याधुनिक मॉडेल्स लाँच केली आहेत, ज्यामुळे अमेरिकी कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः DeepSeek नावाच्या चिनी स्टार्टअपने अतिशय स्वस्त आणि प्रभावी एआय मॉडेल आणून मोठा धमाका केला. त्यामुळे OpenAI आणि इतर कंपन्यांवर जास्तीत जास्त फीचर्स आणण्याचा दबाव वाढला आहे.

हे ही वाचाः iphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात कधी होणार लाँच?

ChatGPT मध्ये जर व्हिडिओ जनरेशन या फीचरचा समावेश झाला, तर हे एआय क्षेत्रातील मोठं पाऊल ठरेल, यात काही शंका नाही. सध्याच्या काळात ओपन एआय त्याच्या Sora मॉडेलला ChatGPT मध्ये आणण्याच्या दिशेत काम करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक सहज आणि सोपी व्हिडिओ जनरेशन सेवा मिळू शकते. मात्र, ओपन एआय या फीचरची अधिकृत घोषणा कधी करेल आणि त्यात काय काय सुविधा असतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!