HomeमनोरंजनDigi Locker : आता गाडीचे डॉक्यूमेंट्स खिशातून फिरवायची गरज नाही, एका क्लिकवर...

Digi Locker : आता गाडीचे डॉक्यूमेंट्स खिशातून फिरवायची गरज नाही, एका क्लिकवर होईल काम!


डिजी लॉकर: डिजीलॉकर भारत सरकारनं बनवलेलं एक क्लाऊड-आधारित सेवा आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे ठेऊ शकता. या अॅपचा वापर करून तुम्ही तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट्स, जसे की ड्रायविंग लायसन्स (डीएल) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), डिजीलॉकरमध्ये सहज सेव्ह शकता.

डिजीलॉकरमध्ये गाडीचे डॉक्युमेंट्स कसे सेव्ह करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजीलॉकरमध्ये तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट्स असल्यानं तुम्हाला ते हरवतील का याची चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. याशिवाय तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नेहमी सोबत ठेवण्याची गरज नाही. तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोनवर डिजीलॉकर अॅप वापरून सहज पाहू शकता आणि दाखवू शकता. याचाच अर्थ तुमचा फोन आता सगळं काम करु शकणार आहे.

1. तुमचे डॉक्युमेंट्स डिजीलॉकरमध्ये सुरक्षितपणे सेव्ह करण्यात येतात, त्यामुळे ते हरवण्याची किंवा खराब होण्याची कोणतीही भीती नाही.
2. डिजीलॉकरमध्ये सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स मोटर वाहन अधिनियम, 1988 अंतर्गत वैध मानले जातात. तुम्ही ते ट्रॅफिक पोलिस किंवा इतर अधिकाऱ्यांना दाखवू शकता.

पर्यावरणपूरक सेवा असल्यानं पर्यावरणासाठी चांगला पर्याय

1. डिजीलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स डिजिटल स्वरूपात सेव्ह केल्यानं कागदाचा वापर कमी केला जातो, जे पर्यावरणासाठी चांगलं आहे.
2. डिजीलॉकरमध्ये गाडीचे डॉक्युमेंट्स कसे सेव्ह करायचे?
3. सगळ्यात आधी डिजीलॉकर अकाउंट तयार करा. जर तुमच्याकडे डिजीलॉकर अकाउंट नसेल, तर तुम्ही ते डिजीलॉकरच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर तयार करू शकता.
4. अकाउंटमध्ये लॉग इन करा आणि त्यानंतर एकदा तुमचं अकाउंट तयार झालं की, तुमच्या यूझरनेम आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा.

हेही वाचा : फक्त 7.99 लाखात खरेदी करा महिंद्राची ‘ही’ SUV; सेफ्टीमध्ये नाही तोड

डॉक्युमेंट इशूअर किंवा जारी करणं हा ऑप्शन निवडा

1. ‘जारीकर्ता’ या टॅबमध्ये ‘सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय’ पर्याय निवडा.
2. त्यानंतर ‘डॉक्युमेंट प्रकार’ विभागात, तुम्हाला सेव्ह असलेलं डॉक्युमेन्ट, जसं की ‘ड्रायविंग लायसन्स’ किंवा ‘रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट’ निवडा.
3. डिटेल्स भरा त्यासाठी तुमचा डीएल किंवा आरसी नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.
4. कागदपत्र मिळवा या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा कागदपत्र डिजीलॉकरवर डाउनलोड करण्यात येईल आणि अशा प्रकारे तुम्हाला आता तुमच्या फोनवर सगळे डॉक्युमेन्ट्स उपलब्ध होईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!