HomeमनोरंजनRoyal Enfield धुमाकूळ घालणार! नव्या लूकमध्ये लाँच केली Guerrilla 450, किंमत फक्त...

Royal Enfield धुमाकूळ घालणार! नव्या लूकमध्ये लाँच केली Guerrilla 450, किंमत फक्त…


रॉयल एनफिल्ड गनिमी 450: ऑटो क्षेत्रावर कैक वर्षांपासून दबदबा असणाऱ्या रॉयल एनफिल्डनं आता पुन्हा एकदा बाईकप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करत कंपनीची Guerrilla 450 ही बाईक एका नव्या रुपात सादर केली आहे. तरुणाईमध्ये या बाईकचं असणारं वेड पाहता त्यांच्याच पसंतीस उतरणाऱ्या अंदाजात ही बाईक कंपनीनं सादर केली आहे.

दमदार परफॉर्मन्स, समाधानकारक मायलेज, कोणत्याही बाईकप्रेमीच्या पसंतीस पडतील असे फिचर या साऱ्याचा सारासार विचार करत बाईक तयार करणाऱ्या एनफिल्डनं गुरिल्ला 450 ही नव्या रुपातील बाईक आता ब्राँझ रंगात सादर केली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत आहे, 2 लाख 49 रुपये. बाईकला नवा लूक देण्यासाठी Peix Bronze हा रंग निवडण्यात आला आहे. जिच्या डॅश व्हेरिएंटमध्ये स्मोक सिल्व्हर रंगसुद्धा पाहायला मिळणार आहे. ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणं डॅश व्हेरिएंटला हा रंग देण्यात आला आहे.

सध्या ही बाईक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून तिच्या किमती आणि फिचर वेगवेगळे आहेत. बाईकच्या Analogue वेरिएंटमध्ये बेसिक फिचर आणि सिल्वर स्मोक रंग देण्यात आले आहेत. ज्यासाठी 2 लाख 39 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागते. बाईकचं डॅश वेरिएंट 2 लाख 49 हजार रुपयांना असून यामध्ये डिजिटल डिस्प्लेसह स्मोक सिल्वर आणि Peix Bronze असे रंग उपलब्ध आहेत.

बाईकचा रंग बदलला असला तरीही मॅकेनिकल स्पेसिफिकेशनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. थोडक्यात या बाईकमध्ये तुम्हाला शेरपा 450 इंजिन मिळणं सुरूच राहणार असून, ही बाईक हिमालयन 450 पेक्षाही अधिक चांगलं परफॉर्म करते. ही बाईक 452 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल इंजिनसह विक्रीसाठी उपलब्ध असून, बाईकचं इंजिन 8000 आरपीएमसह 39.52 बीएचपी पॉवर जनरेट करतं. तर, 5500 आरपीएमसह 40 एनएम इतका टॉर्क जनरेट करतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!