Homeमनोरंजनमहिलेला 'तू मला आवडतेस' असा मेसेज करणं विनयभंगच; कोर्टाचा निर्णय, मुंबईकराला तुरुंगवास

महिलेला ‘तू मला आवडतेस’ असा मेसेज करणं विनयभंगच; कोर्टाचा निर्णय, मुंबईकराला तुरुंगवास


रात्री महिलेच्या संदेशांबद्दल कोर्टाचे प्रकरणः जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला ‘तू मला आवडतेस’, असा मेसेज केला, तर तुम्हाला न्यायालयामध्ये दोषी ठरवून थेट शिक्षा होऊ शकते. नुकतेच असेच एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये समोर आलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मेसेजच्या आधारे आरोप निश्चित करत मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला, ‘तू खूप सुंदर दिसतेस’ असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच असल्याचं निरिक्षण दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

न्यायालयातील युक्तीवादानुसार, तक्रारदार महिलेला एक पुरुष सतत व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. रात्री 11 ते 12.30 वाजण्यादरम्यान तो विविध फोटो आणि मेसेज या महिलेला व्हॉट्सअपवर पाठवायचा. “तू सडपातळ आहेस, तू खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस. मी 40 वर्षांचा आहे, तुझे लग्न झालं आहे का?” असे मेसेज तो व्यक्ती या महिलेला सतत करायचा. “अनेकदा त्याने तू मला आवडतेस”, असेही मेसेज केल्याचं तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे. सततच्या मेसेजेसला कंटाळून या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

शिक्षेला आव्हान

याप्रकरणीत न्यायालयाने 2022 रोजी आरोपीला दोषी ठरवले होते. त्याला तीन महिने तुरुगंवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी त्या आरोपीने कोर्टात बाजू मांडली. राजकीय वैमनस्यामुळे मला या प्रकरणात अडकवलं जात आहे, असे आरोपीने म्हटले. मात्र, न्यायालयाने आरोपीचा युक्तीवाद फेटाळून लावत ‘तुझ्याकडे असलेला एकही पुरावा सिद्ध होत नाही,’ असे सांगितले.

न्यायालयाने निकालात काय म्हटलं?

यावेळी दिंडोशी सत्र न्यायालयाने आपलं सविस्तर निरीक्षण या प्रकरणात नोंदवले. “कोणतीही महिला अशाप्रकारे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. अनोळखी महिलेला तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस, मला तू आवडतेस, असे मेसेज करणे म्हणजे विनयभंगच आहे. हे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात,” असं न्यायालयाने निकालात म्हटलं आहे. “कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाही. विशेषतः जेव्हा मेसेज पाठवणारा आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतही नसतील. हे मेसेज आणि कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे”, असा निकाल देत न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!