Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकवैदिक धर्म, राष्ट्रधर्म आणि ‘शंखनाद महोत्सवा’चे महत्त्व !

वैदिक धर्म, राष्ट्रधर्म आणि ‘शंखनाद महोत्सवा’चे महत्त्व !

सनातन वैदिक धर्म हा भारताचा आत्मा आहे, आणि राष्ट्राच्या अस्तित्वाचा खरा आश्रयही तोच. “यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीः स धर्मः” ही भारतीय तत्त्वज्ञानाची दिव्य व्याख्या आहे. जी जीवनाच्या दोन्ही पातळ्यांना संतुलित करते: लौकिक उन्नती आणि परमकल्याण. जगात अनेक विचारसरणी उदयास आल्या, काही प्रभावी ठरल्या, काही लयास गेल्या; परंतु मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे, हे सांगण्याची स्पष्टता केवळ सनातन धर्माकडेच आहे. म्हणूनच भारत हे केवळ भूभागाचे नाव नसून एक सर्वश्रेष्ठ संस्कृती, एक जीवन जगण्याची तेजस्वी परंपरा, अविनाशी धर्मजीवन आहे. म्हणूनच भारत एक शाश्वत आध्यात्मिक राष्ट्र आहे.

जगातील ग्रीक, रोमन, झारची रशिया ही प्रबळ साम्राज्ये वेळोवेळी उभी राहिली आणि नष्ट झाली. परंतु भारत आजही तितक्याच

सामर्थ्याने उभा आहे, कारण या राष्ट्राचे अस्तित्व राजकीय बांधणीत नसून, लोकांच्या मनातील संस्कृती, श्रद्धा, धर्मनिष्ठ मूल्ये, आणि पवित्र परंपरांमध्ये आहे. राम, कृष्ण, शिव, गाय, गंगा, मातृभूमी या सर्वांविषयीची अनुभूती आजही भारतीयांच्या चेतनेत आहे अन् हृदयामध्ये धडधडते. म्हणूनच भारत अविनाशी आहे. राष्ट्राला नष्ट करायचे अनेक प्रयत्न झाले; मात्र अवतार, संत राष्ट्रपुरुष यांनी वेळोवेळी भारताचे रक्षण केले हा इतिहास दाखवतो; आणि म्हणूनच भारताच्या धर्मजीवन, भावजीवनाचे रक्षण म्हणजे धर्मरक्षण !

आज भारत तांत्रिक, सामरिक आणि अर्थकारणात झपाट्याने पुढे जात असला, तरी दहशतवाद, नक्षलवाद, सांस्कृतिक विघातकता, अतिरेकी विचारसरणी आणि आंतरिक फूट यांसारखी अनेक आव्हाने समोर आहेत. केवळ राजकीय धोरणांनी किंवा मतांसाठी झुकणाऱ्या धर्मनिरपेक्षतेने राष्ट्र सुरक्षित राहणार नाही. राष्ट्राला जीवंत ठेवणारी शक्ती म्हणजे धर्माधिष्ठित जीवनमूल्ये, साधकता, शौर्य आणि सामाजिक बांधिलकी. म्हणूनच भारतीय राष्ट्रपुनरुत्थानाचा मार्ग सनातन धर्मातूनच जातो, हे योगी श्रीअरविंदांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून राष्ट्रचेतनेचे पुनरुज्जीवन करणारा ऐतिहासिक सोहळा आहे. १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी भारत मंडपममध्ये होणाऱ्या या महोत्सवात संरक्षण, संस्कृती, समाजजीवन, राष्ट्रीय सुरक्षा, परंपरा आणि तत्त्वज्ञान यांच्यातील संबंधांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. २५० हून अधिक विविध प्रकारची शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी, पारंपरिक युद्धकलेचे प्रात्यक्षिक, विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संत-महंतांची प्रेरणा आणि ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयावरचे सखोल सत्र, हे सर्व राष्ट्राला नवीन दिशा देणारे ठरणार आहे.

महाभारतात श्रीकृष्णांनी जसा धर्मयुद्धासाठी शंखनाद केला, तसा आजचा हा महोत्सवही भारताला धर्माधिष्ठित, सुरक्षित आणि जागृत राष्ट्राकडे नेणारा नवा शंखनाद आहे. प्रत्येक सनातन धर्मीयांनी हा संदेश आत्मसात करून कृतीत उतरवला, तर हा महोत्सव नवयुगाची, रामराज्याची सुरुवात ठरेल.

– श्री. दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक तथा व्याख्याते

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!