Homeमहाराष्ट्रवाहतूककोंडी सुटण्यास, वाहतूकव्यवस्था सुधारण्यास पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे मदत होईल :...

वाहतूककोंडी सुटण्यास, वाहतूकव्यवस्था सुधारण्यास पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे मदत होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र (मुंबई, दि.२५) : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २ अ) आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका २ ब) या दोन मार्गिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांची वाटचाल अधिक गतिमान होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानत, या निर्णयामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेतील अडचणी कमी होतील, तसेच सार्वजनिक वाहतूक, औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक विकासास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पातील पहिला टप्पा वणाज ते रामवाडी मार्गिकेपर्यंत मर्यादित होता. आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत मंजूर झालेल्या या दोन्ही मार्गिका उन्नत स्वरूपाच्या असून त्यांची एकूण लांबी १२.७५ किमी आहे. या मार्गिकांवर १३ स्थानके असतील. या सेवेमुळे चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी, वाघोली परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी एकूण ३,६२६ कोटी २४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून चार वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून **’प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट’ (पीएमयु)**च्या माध्यमातून नियमितपणे बैठका घेऊन प्रकल्पाला गती देण्याचे काम केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून आजही (ता. २५) त्यांनी पीएमयुची बैठक घेऊन पुण्यातील आणि राज्यातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालयातील आणि पुण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!