Homeमुळशीमाण येथील आजारी युवकाला लाखमोलाची मदत ; हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर ठरले...

माण येथील आजारी युवकाला लाखमोलाची मदत ; हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर ठरले आधारवड

मुळशी (हिंजवडी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या नगरीतून माणुसकीचे जिवंत उदाहरण घडले आहे. माण येथील संतोष सुभाष भोसले या युवकावर उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज असताना, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी रुग्णालयात भेट देत लाखमोलाची मदत सुपूर्द करत आपले सामाजिक भान जपले.

संतोष भोसले हे गेले १४ महिने पोटाच्या गंभीर व्याधीने त्रस्त आहेत. चार वेळा Endoscopy सर्जरी करूनही आराम न मिळाल्याने आता Pancreatitis Triple Bypass ही जटिल शस्त्रक्रिया त्यांच्यावर होणार आहे. या उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असून कुटुंबीय आर्थिक मदतीसाठी धावपळ करत आहेत.

ही बाब सरपंच गणेश जांभुळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन संतोष यांची भेट घेतली. “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असे सांगत त्यांनी आर्थिक मदत दिली. या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारी आपुलकी व दिलासा देणारी साथ रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरली.

जांभुळकर यांच्या या माणुसकीच्या कृतीचे माण परिसरात, तसेच हिंजवडी व मुळशी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन मदतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन सरपंच गणेश जांभुळकर यांनी यावेळी केले.

या प्रसंगी हिंजवडीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विशाल साखरे, मच्छिंद्र हुलावळे, सुरज जांभुळकर, प्रशांत वाघमारे, महेंद्र राजीवडे आणि इतर मित्रमंडळी उपस्थित होती.

एकीकडे राजकारणातील द्वेषाच्या बातम्या गाजत असताना, अशा माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या घटनांमुळे समाजात सकारात्मकता नक्कीच वाढीस लागेल.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!