Homeपुणे / पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेकडून संजय दुधाणे गौरवित

महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेकडून संजय दुधाणे गौरवित

पुणे :  महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्‍यावतीने ऑलिम्पिक दिनानिमित्त क्रीडा लेखक व पत्रकार संजय दुधाणे यांचा गौरव करण्यात आला. नीरज चोप्रा पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कार मिळाल्‍याबद्दल त्‍यांना विशेष सन्‍मानित करण्यात आले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि सर परशुराम महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ऑलिम्‍पिक दिन समारंभात क्रीडा व युवक कल्‍याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्‍या हस्‍ते शाल, सन्‍मानचिन्‍ह, पुष्पगुच्‍छ देऊन संजय दुधाणे यांचा गौरव करण्यात आले. यावेळी ऑलिम्पिकपटू रेखा भिडे, मनोज पिंगळे, अर्जून पुरस्‍कार प्राप्‍त प्रदिप गंधे, शंकुतला खटावकर क्रीडा व युवक कल्‍याण विभागाच्‍या आयुक्‍त शीतल तेली-उगले, सहसचंालक सुधीर मोरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिंरगांवकर, जिल्‍हा क्रीडाधिकारी जगन्‍नाथ लकडे, आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

गतवर्षी ऑलिम्‍पिकमध्ये २ वेळा सुवर्णपदकाचा विक्रम करणाऱ्या नीरज चोप्राचे चरित्र संजय दुधाणे यांनी लिहिले होते. दुधाणे यांनी एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रेरणादायी प्रवास शब्दरूप केला आहे. नीरजच्‍या दुहेरी ऑलिम्‍पिक यशाचे साक्षीदार असणाऱ्या दुधाणे यांनी मैदानातील वर्णन हे प्रत्‍यक्ष स्‍पर्धेची अनुभूती देणारे ठरले आहे. हे पुस्तक मराठीसह इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाले आहे. ऑलिंपिक कांस्य पदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्‍या हस्‍ते या चरित्राचे प्रकाशन झाले होते. २०२४ मधील पुस्‍तकासाठी संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्‍कारने सन्‍मानित करण्यात आले. या पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल संजय दुधाणे यांचा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने सन्‍मान केला.

प्रा. संजय दुधाणे यांची ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, संत सीतामाई, संत गणोरेबाबा, मेजर ध्यानचंद, भारतरत्न सचिन तेंडुलकर, फ्लाईंग शीख मिल्खासिंग, सुपर मॉम मेरी कोम, गोल्डन बॉय नीरज ही चरित्रे आणि आशियाई स्पर्धा, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडापर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या, ऑलिम्पिक अमृतानुभव, खेळांचा राजा-फुटबॉल, भारताचे ऑलिम्पिक, भारतीय खेळ, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी ही क्रीडाविषयक पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.

क्रीडामंत्रींनी दिली शाबासकी 

लेखक संजय दुधाणे यांचा सत्‍कार जागेवर धनजंय भोसले यांच्‍या हस्‍ते केला जाणार होता. तसे सूत्रसंचालकांने घोषितही केले . तेव्‍हा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुधाणे यांचा सन्‍मान व्‍यासपीठावर करण्याबाबत सूचना दिल्‍या. व्‍यासपीठावर बोलवून सत्‍कारानंतर क्रीडामंत्री भरणे यांनी त्‍यांना शाबासकी देऊन आपल्‍या मनोगतात दुधाणे यांचा विशेष उल्‍लेखही भरणे यांनी केला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!