Homeपुणे / पिंपरी-चिंचवडमहापालिका निवडणुका दिवाळीनंतरच? प्रभाग रचनेला महिनाभराची मुदतवाढ

महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच? प्रभाग रचनेला महिनाभराची मुदतवाढ

पुणे : राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी दिवाळीपूर्वी बिगुल वाजणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, नगरविकास विभागाने प्रभागरचनेसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याने आता या निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर सत्ताधारी, विरोधक, आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांनी तयारीला गती दिली होती. पक्षपातळीवर बैठका, कार्यकर्त्यांमध्ये संवाद, जनसंपर्क मोहिमा सुरू झाल्या होत्या. निवडणूक आयोगानेही प्रभागरचनेसाठी कार्यक्रम आखल्याने निवडणूक दिवाळीपूर्वी होईल, असा अंदाज होता.

मात्र सोमवारी (२३ जून) नगरविकास विभागाने अचानक पत्रक जारी करून प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या तारखेत बदल करत एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याचे संकेत ठळकपणे दिसत आहेत.

प्रभाग रचना प्रक्रिया अशा पद्धतीने

  • मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अ, ब, क, ड वर्ग महापालिका आणि नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठी संबंधित आयुक्त, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
  • प्रभाग रचनेचे प्रारूप संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करावे लागणार आहे.
  • त्यानंतर नगरविकास विभागाकडून छाननी होऊन निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवले जाईल.
  • आयोगाकडून मंजुरी मिळाल्यावर प्रारूप प्रसिद्ध होईल आणि नागरिकांकडून हरकती मागवण्यात येतील.
  • सुनावणी पार पडल्यानंतर अंतिम प्रभाग रचना घोषित होईल.

ड वर्ग महापालिका व नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठीही हीच प्रक्रिया अनुसरण्यात येणार आहे. ड वर्गात प्रभाग आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुढे पाठवला जाणार आहे. नगर पंचायतींसाठीही मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व नगरविकास विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

या विलंबामुळे इच्छुक उमेदवारांचे गणित बिघडले असून पक्षांतील तयारीसही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अनेकांनी जनसंपर्काची तयारी सुरू केली असली तरी निवडणुका दिवाळीनंतर किंवा नववर्षातच होण्याची शक्यता अधिक ठळक झाली आहे.

📌 थोडक्यात

प्रभागरचनेसाठी मुदतवाढ
निवडणुकीचे वेळापत्रक पुढे सरकण्याची शक्यता
इच्छुकांमध्ये संभ्रम, पक्षांत हालचाली मंदावण्याची चिन्हे

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!