Homeमुळशीभोर-मुळशी मतदारसंघातील १४६ विकासकामांसाठी ३८ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर : आमदार...

भोर-मुळशी मतदारसंघातील १४६ विकासकामांसाठी ३८ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर : आमदार शंकर मांडेकर यांची माहिती

मुळशी-भोर-वेल्हे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून भोर-मुळशी-राजगड (वेल्हे) विधानसभा मतदारसंघातील विविध १४६ विकासकामांसाठी ३८ कोटी ७२ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या निधीतून ग्रामीण भागातील विविध प्राथमिक गरजांवर भर देण्यात आला असून, रस्ते, गटारे, जलसंधारण, आरोग्य सुविधा, अंगणवाडी इमारती, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालये यासारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

आमदार मांडेकर म्हणाले, “२५-२६ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, या कामांसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल.” त्यांनी पुढे सांगितले की, या निधीमधून भोर, मुळशी आणि वेल्हे तालुक्यांतील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे उद्दिष्ट आहे.

विभागानुसार मंजूर निधीचा तपशील पुढीलप्रमाणे –

  • जनसुविधा (५४ कामे) : ₹८ कोटी २९ लाख ६० हजार
  • नागरी सुविधा (३४ कामे) : ₹५ कोटी ६७ लाख ३० हजार
  • ग्रामीण रस्ते (३०-५४ रस्ते – ३२ कामे) : ₹८ कोटी ३० लाख
  • इतर जिल्हा मार्ग (५०-५४ रस्ते – ७ कामे) : ₹४ कोटी ५० लाख
  • जलसंधारण विभाग (११ कामे) : ₹२ कोटी २० लाख ५५ हजार
  • नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम (५ कामे) : ₹५६ लाख २५ हजार
  • प्राथमिक आरोग्य केंद्र विस्तारीकरण व देखभाल (३ कामे) : ₹८ कोटी ८९ लाख २९ हजार

या कामांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होतील, विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास आमदार मांडेकर यांनी व्यक्त केला.

या निधीमुळे आगामी काळात भोर, मुळशी व वेल्हे तालुक्यांतील अनेक लांबवलेल्या किंवा प्रलंबित असलेल्या योजना मार्गी लागणार आहेत. खास करून आरोग्य सेवा आणि अंगणवाडी सुविधा उभारणीवर विशेष भर देण्यात आला आहे.

भविष्यातही मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार मांडेकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!