Homeपुणे / पिंपरी-चिंचवडभारती सहकारी ग्राहक भांडारात नव्या नेतृत्वाची निवड; विजयमाला कदम अध्यक्षपदी, डॉ. भागवतराव...

भारती सहकारी ग्राहक भांडारात नव्या नेतृत्वाची निवड; विजयमाला कदम अध्यक्षपदी, डॉ. भागवतराव पवार उपाध्यक्षपदी

पुणे, (दि.२६) : भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लि., पुणे या संस्थेच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर संस्थेच्या नव्या अध्यक्षपदी विजयमाला पतंगराव कदम तर उपाध्यक्षपदी डॉ. भागवतराव पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी व सहनिबंधक नीलम पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

विजयमाला कदम या १९८५ पासून संचालक म्हणून कार्यरत असून संस्थेच्या व्यवसाय वृद्धीमधील त्यांचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीस लाखोंमध्ये असलेली वार्षिक उलाढाल आज ६० कोटी रुपयांवर पोहचली असून संस्था यशाच्या शिखरावर पोहोचण्यामागे त्यांचे कृतीशील नेतृत्व असल्याचे मानले जाते.

संस्थेच्या दहा शाखांचा विस्तार, आधुनिक बझार व्यवस्था, होलसेल विभागाची पुनर्रचना, गृहिणी, महिला व विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना, वार्षिक धान्य महोत्सव, तसेच हळदी-कुंकू सारख्या सांस्कृतिक उपक्रमांमधून ग्राहकाभिमुख दृष्टिकोन त्यांनी जपला. कार्यक्षम व तंत्रस्नेही प्रशासकीय यंत्रणा, पारदर्शक व्यवहार, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांकरिता संगणकीकरणाची अंमलबजावणी यामुळे संस्थेची वाटचाल अधिक गतिमान झाली आहे.

निवडीनंतर बोलताना विजयमाला कदम म्हणाल्या, “डॉ. पतंगराव कदम यांनी २ ऑक्टोबर १९७३ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त संस्थेची स्थापना करताना ठरवलेली उद्दिष्टे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी व ग्राहक यांच्या सहकार्याने त्या उद्दिष्टपूर्तीची दिशा कायम राहील.”

या प्रसंगी डॉ. मंदाकिनी पानसरे, वसंतराव माने, नगरसेवक रामचंद्र कदम, डॉ. भागवतराव पवार, कुलदीप गायकवाड आणि सरव्यवस्थापक जगन्नाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करताना भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, स्वप्नाली कदम, डॉ. के.डी. जाधव, डॉ. एम.एस. सगरे, व्ही.बी. म्हेत्रे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!