Homeपुणे / पिंपरी-चिंचवडभारती विद्यापीठ आणि क्लायमेटोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

भारती विद्यापीठ आणि क्लायमेटोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

पुणे : भारती विद्यापीठ आर्किटेक्चर महाविद्यालय आणि मुंबई येथील क्लायमेटोरा एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने एआयसीटीई प्रशिक्षण व शिक्षण प्रशिक्षण अकॅडमी कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत सहा दिवसांचा ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यशस्वीपणे पार पडला.

‘हवामान कृतीसाठी अभ्यासक्रम – शाश्वत शिक्षण वातावरणाकडे वाटचाल’ या विषयावरील कार्यशाळा २२ ते २७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न झाली.

या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चा उद्देश उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांमध्ये हवामान बदल शिक्षण, हरित कौशल्ये आणि शाश्वततेचे तत्व समाविष्ट करण्याचे नवीन उपक्रमाचा मार्ग शोधणे हा होता. देशभरातून १३१ प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात यांत्रिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, शहरी नियोजन, शहरी संवर्धन, मूलभूत व जीवशास्त्र, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोटेक्नॉलॉजी अशा विविध शाखांतील प्राध्यापक व तज्ज्ञांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉ. कविता मुरूगकर, सह-समन्वयक अदिति लंके, सहयोगी प्रा. एम. आर्च व क्लायमेटोरा एलएलपीच्या व्यवस्थापकीय भागीदार श्रीमती देबदत्ता उपाध्याय उपस्थित होते.

क्लायमेटोरा एलएलपी, मुंबईस्थित संस्था ही हवामान कृती व शाश्वततेसाठी आवश्यक संसाधने, प्रशिक्षण व तांत्रिक मदत पुरवते. संस्था कार्बन व वॉटर फूटप्रिंट कॅल्क्युलेटर्स, ऑनलाइन अकॅडमी, आणि हवामान विज्ञान, डेटा विश्लेषण व धोरण यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन पुरवते.

फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम दरम्यान भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १३ मान्यवर तज्ज्ञांनी शाश्वत शिक्षण वातावरण, हवामान प्रतिसादक्षम अभ्यासक्रम रचना आणि नवकल्पनाशील अध्यापन पद्धतींवर सत्र घेतली. याकार्यशाळेत संजय सेठ, डॉ. रिकार्डा रेडेकर, श्री स्पंदन शाह, डॉ. प्रियदर्शिनी कारवे या प्रमुख वक्त्यांनी व्याख्याने दिली. तसेच कार्बन अकाउंटिंग, ESG सेवा, हवामान विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी चर्चेत सहभाग घेतला. हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ज्ञान, सहकार्य व क्षमता विकासासाठी एक प्रभावी ठरले. सहभागी प्राध्यापकांना शैक्षणिक समृद्धीबरोबरच शाश्वततेचे सैद्धांतिक व व्यावहारिक मार्गदर्शन मिळाले. तसेच भविष्यातील हवामान आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षण संस्थांना सक्षम बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!