Homeपुणे / पिंपरी-चिंचवडपाठपुराव्याला यश; पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी! ; केंद्रीय मंत्री मोहोळ यांची...

पाठपुराव्याला यश; पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी! ; केंद्रीय मंत्री मोहोळ यांची माहिती

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारकडून अखेर मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे पुण्याच्या पूर्व-पश्चिम भागांना आता जलद आणि आधुनिक मेट्रोसेवेची जोड मिळणार आहे.

वनाज-चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी-वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन नवे मेट्रो मार्ग या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. एकूण १२.७५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात १३ स्थानकं असतील, जी बावधन, कोथरूड, खराडी, वाघोली या भागांना थेट मेट्रोशी जोडणार आहेत.

मोहोळ यांनी सांगितले की, “या मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे.” तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानले.

या नव्या मार्गांमुळे वनाज-रामवाडी या विद्यमान मेट्रो मार्गाचे प्रभावीपणे विस्तारीकरण होणार आहे. जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक हे या दोन्ही नवीन कॉरिडॉर्ससाठी इंटरचेंज पॉइंट असणार आहे, जिथे Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी थेट जोड मिळेल.

या प्रकल्पामुळे IT हब, शैक्षणिक संस्था, रहिवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील नागरिकांसाठी मेट्रो हा सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे, चांदणी चौक व वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांतून येणाऱ्या प्रवाशांना मेट्रोची थेट जोड मिळणार आहे.

₹३,६२६.२४ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी महा-मेट्रोमार्फत होणार असून, पुढील चार वर्षांत तो पूर्ण केला जाणार आहे. पुणे शहरासाठी स्मार्ट आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रणाली उभारण्याच्या दिशेने ही एक महत्त्वाची झेप ठरणार आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

मौलानाचे वादग्रस्त विधान- श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे:लखनौमध्ये आंदोलन, संतांनी सांगितले –...

0
यूपीमधील इटावा येथील मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्णावर वादग्रस्त विधान केले आहे. मौलाना म्हणाले, भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होते आणि दिवसातून 5...
spot_img

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...

विप्रोला पहिल्या तिमाहीत ₹3,352 कोटींचा नफा:महसूल 10% वाढला, कंपनीने ₹2 लाभांश जाहीर केला; ॲट्रिशन...

0
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक...
error: Content is protected !!