Homeपुणे / पिंपरी-चिंचवडडोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून बँकेने वाटचाल करावी: डॉ.विश्वजीत कदम

डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून बँकेने वाटचाल करावी: डॉ.विश्वजीत कदम

भारती सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १२% लाभांश जाहीर

पुणे दि.२९ : भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली चौथी आर्थिक महासत्ता असून बँकिंग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत या बदलाच्या गतीने भारती बँकेने डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून वाटचाल करायला हवी असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी भारती सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला कदम, कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, भारती सहकारी बँकेचे अध्यक्ष सीए जयेश विजयकुमार दुधेडिया, उपाध्यक्ष डॉ.नितीन नायक, बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए बी.बी.कड, डॉ.एम.एस.सगरे, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, संजीव पाटील उपस्थित होते.

डॉ.कदम पुढे म्हणाले, डॉ.पतंगराव कदम यांनी भारती बँकेची स्थापना अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य माणसास अर्थसहाय्य करण्यासाठी केली आहे त्यामुळे आज समाजात सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख आहे. तसेच ग्राहकांना अद्ययावत सुविधा देऊन त्यांना समाधानी ठेवावे लागेल. बँकिंग क्षेत्रामधील चालूघडामोडीवर लक्ष ठेऊन आत्मपरीक्षण करून येणारी नवी आव्हाने पेलण्यासाठी आपण सर्वांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. बँकेचे अध्यक्ष दुधेडिया यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेऊन पुढील ध्येय धोरणांचा आराखडा मांडला. यावेळी बँकेच्या २३ शाखेतून उत्कृष्ट शाखा, अधिकारी, लेखनिक आणि शिपाई यांचा सन्मान करण्यात आला.

व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव पाटील यांनी अहवाल वाचन केले. भारती बँक ही मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक असून आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर बँकेचा व्यवसाय रु.२४१९.८७ कोटी असून ढोबळ नफा रु.२२.३८ कोटी तर निव्वळ नफा रु.१३.५८ कोटी झाला असून निव्वळ NPA शून्य टक्के राखण्यात बँकेने यश मिळविले असून गेल्या दोन वर्षांपासून १२% लाभांशाची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे. तसेच यावर्षीपासून बँकेने ग्राहकांना आय एम पी एस ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वैधानिक लेखापरीक्षणामध्ये बँकेने ‘अ ‘ दर्जा प्राप्त केला आहे. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. संचालिका डॉ. ज्योती मंडलिक यांनी आभार मानले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!