Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकजलप्रदूषण आणि अपप्रकार रोखणारे 'खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची' यशस्वी द्वितपपूर्ती!

जलप्रदूषण आणि अपप्रकार रोखणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची’ यशस्वी द्वितपपूर्ती!

खडकवासला जलाशय रक्षण मोहीम: पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी दीपस्तंभ !

पुणे  हिंदु जनजागृती समिती मागील २३ वर्षापासून खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवत आहे. धरण परिसरात जलाशय रक्षणाची अखंड, अविरत आणि प्रेरणादायी मोहीम खडकवासला ग्रामस्थ तसेच सामाजिक जाणीव असलेल्या पुणेकरांच्या सहभागातून प्रतिवर्षी होत असते. या मोहिमेचे यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार श्री भीमराव (आण्णा) तापकीर यांनी नारळ वाढवून मोहिमेचे उद्घाटन केले. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी जलाशयाचे पावित्र्य अबाधित राहावे या संकल्पातून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, खडकवासला ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाचे रक्षण करतात. समितीची ही मोहीम प्रतिवर्षी शतप्रतिशत यशस्वी झाली आहे. मोहीम सुरू झाल्यापासून एकाही व्यक्तीने जलाशयात प्रवेश केला नाही. निसर्गरक्षणाचा ध्यास, समाज प्रबोधनाची तळमळ, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही मोहीम पर्यावरण संवर्धनाचा एक दीपस्तंभ ठरली आहे.

पुणे शहर आणि परिसरातून आलेले २०० हून अधिक धर्मप्रेमी प्रबोधनात्मक फलक हातात धरून खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून उभे होते. सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानामध्ये स्थानिक ग्रामस्थांसह, पारगाव, दौंड, सासवड, तळेगाव, भोर,शिरवळ मांजरी, पुणे शहर अशा ठिकाणाहून जागरूक नागरिक सहभागी झाले होते.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री भीमराव (आण्णा) तापकीर, पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. धनश्री दत्तात्रय कोल्हे, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. दत्तात्रय कोल्हे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष सारंग नवले, नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

धरणाच्या पाण्यात कोणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण करू नये यासाठी समिती नि:स्वार्थपणे हे कार्य करत आहे. सर्व नागरिकांनी जलस्रोत सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ, पोलीस, प्रशासन,जागरूक नागरिक आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले.  प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले.

अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 8 मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!