Homeपुणे ग्रामीणखडकवासला धरणातून मुठा नदीत १९२० क्युसेकने विसर्ग; नागरिकांना दक्षतेचा इशारा

खडकवासला धरणातून मुठा नदीत १९२० क्युसेकने विसर्ग; नागरिकांना दक्षतेचा इशारा

पुणे (खडकवासला) :  खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (बुधवार) दुपारी १ वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात १९२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता (खडकवासला विभाग) यांनी दिली आहे.

धरण क्षेत्रात होत असलेला पाऊस आणि येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गाचे प्रमाण पुढील काळात कमी किंवा जास्त केले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

नदी पात्रालगतच्या सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच जनावरे किंवा तत्सम साहित्य नदीकाठी असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नदीपात्रालगतच्या नागरिकांना प्रशासनाकडून सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले असून, स्थानिक यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या पुणे शहर व परिसरात जोरदार पावसाची स्थिती आहे. त्यामुळे पुढील काही तास नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!